मुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> मदतीची घोषणा स्फोटाच्या आवाजात घुमली अन् विरलीही! ; ‘रंगायतन’ मधील जखमींची वंचना
 


स्पर्धेचे नियम व अटी




मदतीची घोषणा स्फोटाच्या आवाजात घुमली अन् विरलीही! ; ‘रंगायतन’ मधील जखमींची वंचना Bookmark and Share Print E-mail
राजीव कुळकर्णी
ठाण्याचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या गडकरी रंगायतनच्या आवारात गतवर्षी झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमींना शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत अद्यापही मिळालेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या राज्य विधिमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनात आजी-माजी आमदारांचे वेतन, भत्ते तसेच पेन्शनमध्ये भरघोस वाढीचे विधेयक एकमताने मंजूर झाले. मात्र गडकरीमधील स्फोटात जखमी झालेल्या सात जणांसाठी शासनाकडे १.७५ लाखांचाही निधी उपलब्ध होत नाही.
गतवर्षी ४ जून रोजी रंगायतनमध्ये ‘आम्ही पाचपुते’ या नाटकाचा प्रयोग होता. दुपारी चारच्या सुमारास नाटय़गृहाच्या पार्किंगमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट होऊन सातजण जखमी झाले. यातील तिघांवर सरकारी रुग्णालयात, तर चार जणांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी त्याच दिवशी घटनास्थळास भेट देऊन जखमींना शासनातर्फे प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. पालिकेनेही प्रत्येकी १० हजारांचे अर्थसहाय्य घोषित केले व ही रक्कम संबंधितांना अदाही केली.
रंगायतनचे इलेक्ट्रिशियन किशोर सुर्वे, सुरक्षारक्षक श्रीधर सकपाळ, विवेक म्हात्रे, राजेश साळवी, उमेश जाधव, सोमेश्वर महाजन व स्वप्नील दळवी हे सात जण बॉम्बस्फोटात जखमी झाले होते. या घटनेला सव्वा वर्ष होत आले तरी शासनाने जाहीर केलेली मदत त्यांना मिळालेली नाही. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी याप्रकरणी पुनर्वसन विभागाकडे सतत पाठपुरावा चालविलेला असला, तरी मंत्रालयातील नोकरशहा मात्र स्वस्थ बसून आहेत. शासन केवळ घोषणाच करते, मदत देत नाही, अशी भावना बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. ही बाब गंभीर असून हे सर्व जखमी व त्यांचे कुटुंबीय येणाऱ्या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत, अये आमदार केळकर म्हणाले.
यासंदर्भात जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, निधीची अडचण असल्यामुळे या जखमींना सरकारकडून अद्यापि सहाय्य मिळू शकले नाही, असे ते म्हणाले. आता मी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले असून, प्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या जखमींना मदत मिळवून देईन, असे जऱ्हाड यांनी निक्षून सांगितले.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.