मुखपृष्ठ >> बातम्या >> कलावंतांची सुखेनैव ‘सायकलस्वारी’
 

मुंबई वृत्तान्त



स्पर्धेचे नियम व अटी




कलावंतांची सुखेनैव ‘सायकलस्वारी’ Bookmark and Share Print E-mail
किशोर धारगळकर
संजय मोने मिच्र्या-कोथिंबीर आणायला माहीमवरून चक्क सायकलने रानडे रोडला जातो, तर अविनाश खर्शीकरदेखील बँकेच्या कामासाठी सायकललाच पसंती देतो असे तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल ना! स्वत:ची चारचाकी गाडी असूनही व त्यांच्या पेशाला ती गाडी शोभेशी असूनही सायकलला इतकी अचानक पसंती का असा तुमचा प्रश्न असेल? पण या दोघांसह अजित भुरे व या तिघांचा आणखी एक मित्र धनंजय गोरे हे सध्या वरळी ते माहीम परिसरात चक्क सायकलवरून आपले बरेचसे व्यवहार करताना नजरेस पडत असून त्यामुळे अनेकांचे कुतूहल जागे झाले आहे. संजय मोने फार पूर्वीसुद्धा सायकल वापरायचा, पण आता पुन्हा सायकलला पसंती का असे विचारता, त्याच्या स्वभावानुसार पटकन म्हणाला, ‘एक किडा’ दुसरे काय? पण नंतर गंभीरपणे म्हणाला की, खरे तर आपल्याकडचे हवामान सायकलला साजेसे नाही. उन्हाळ्यात तर सायकलस्वारीचा खूप त्रास  असतो. पण दादर परिसरातील गर्दीत गाडी घेऊन सारखा हॉर्न वाजवत ट्रॅफिक जॅममध्ये अडकण्यापेक्षा ‘सायकल दी बेस्ट’. कुठेही, कशीही वळवता वा घुसवता येते. अगदी सायकलवर बसल्या-बसल्या भाजीदेखील खरेदी करता येते. सायकल चालवताना खूप अ‍ॅलर्ट राहावे लागत असल्याने मानसिक व्यायामही होतो आणि सायकल चालवायचा शारीरिक व्यायाम होतोच. सहज गप्पा करता करता मी व अजितने विचार केला की, या चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करूया, मोकळी हवादेखील मिळेल व लहानसहान कामेही भराभर करता येतील. आमचा ध्यास व त्याचे फायदे पाहून वर्षभरात १०० जणांनी सायकलला पसंती दिली तरी ते आमचे यश म्हणेन.
अजित भुरे तर एवढेही म्हणाला की, नव्या मॉडलेची गाडी म्हणजेच सोशल स्टेटस हे सेलिब्रिटीज्नी डोक्यातून काढावे व ओशिवरा, लोखंडवाला परिसरातील अनेकांनी सायकलला पसंती द्यावी. अवघ्या तीन हजार रुपयांत सायकल मिळते. अगदी स्टायलिश व पुढे सामानासाठी जागा असणारी सायकल १५-१७ हजार रुपयांपर्यंत मिळते. पण प्रदूषणापासून सुटका करते. आपले एक वेगळेपण राहते. सध्या एवीतेवी इतरांपेक्षा वेगळे काही करण्याचा ध्यास लागलाय. तर मग मोकळी हवा, व्यायाम व हौसमौज या त्रिसूत्रीचा फायदा देणारी सायकल घ्या. नकळत लहानपणीचे दिवसही आठवतील आणि सारखी गाडी बाहेर काढण्याचा त्रासही वाचेल. माझी ही सकारात्मक भूमिका पाहून माझे मित्र मला विचारू लागलेत, नवीन चांगली सायकल कुठे मिळेल? सेलिब्रिटीजचे अनुकरण खूप लवकर होते. ते अशा चांगल्या गोष्टीसाठी व्हावे..
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.