|
पाणी समस्येसंदर्भात पालिका प्रशासनाने नगरसेवकांना पाठवली प्रश्नावली
|
|
|
|
प्रतिनिधी मुंबई शहरात घरगुती पाणीपुरवठय़ात करण्यात आलेली पंधरा टक्के पाणीकपात आणि तलावातील कमी होणारा पाणीसाठा यामुळे पालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.
त्याचा एक भाग म्हणून पालिका प्रशासनाने नगरसेवकांना एक प्रश्नावली पाठवली आहे. दरम्यान समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापण्याबाबत चर्चा सुरु झाली असून ‘बीएआरसी’कडे समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रस्तावाबाबत प्रशासनाने चर्चा करावी, अशी सूचना शिवसेनेचे नगरसेवक राहूल शेवाळे यांनी प्रशासनाला केली आहे. आपापल्या प्रभागात होणारी पाणीगळती व चोरी, पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करणे, पाणीबचतीचे विविध उपाय, शहरातील जुन्या विहिरी आणि बोअरवेलची दुरुस्ती व त्याचा पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी होऊ शकणारा वापर आदी विषयांवर हे प्रश्न विचारण्यात आले आहेत. प्रशासनाकडून पाठविण्यात आलेली ही प्रश्नावली नगरसेवकांनी भरून द्यावी आणि सूचनाही कराव्यात, असे प्रशासनाने या पत्रात म्हटले आहे.
|