मुखपृष्ठ >> महत्वाच्या बातम्या >> भरती होताच पोलिसांना मिळते ‘हप्त्याचे प्रशिक्षण’!
 

गाथा

 



लोकसत्ता ‘व्हिवा दीवा’
स्पर्धेसाठी अटी व शर्ती

 

फोटो गॅलेरी

भरती होताच पोलिसांना मिळते ‘हप्त्याचे प्रशिक्षण’! Bookmark and Share Print E-mail
प्रशिक्षणात सवलती देण्यासाठी घेतली जाते चिरीमिरी
अभिजित घोरपडे , पुणे, १८ नोव्हेंबर
मुंबईतील हल्ल्यानंतर पोलीस प्रशिक्षणात सुधारणा करण्याच्या वल्गना सरकारकडून होत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र जवानांना भरती झाल्यानंतर ‘हप्त्याचे प्रशिक्षण’ देण्यात येत आहे. राज्यातील बहुतांश पोलीस प्रशिक्षण विद्यालयांमध्ये जवानांना कष्टप्रद प्रशिक्षणातून सवलती देण्यासाठी त्यांच्याकडून सर्रास हप्तावसुली होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
*हप्त्यांबरोबरच प्रशिक्षकांना खुश करण्यासाठी ‘पाटर्य़ा’वरही शेकडो रुपये उडवावे लागतात.
*प्रशिक्षणात सवलती देण्यासाठी प्रत्येकी ३०० ते एक हजार रुपयांपर्यंत ही रक्कम वसूल केली जाते.
*हप्त्यांबरोबरच प्रशिक्षकांना खुश करण्यासाठी ‘पाटर्य़ा’वरही शेकडो रुपये उडवावे लागतात.

सर्वसाधारण प्रशिक्षणाबरोबरच खास कमांडो प्रशिक्षणातूनही अशाप्रकारे हप्ता घेऊन सूट दिली जात आहे. त्यामुळे राज्यात मोठय़ा प्रमाणावर पोलीस भरती होऊनही त्यांच्या प्रशिक्षणाचा दर्जा व पोलीस दलाच्या क्षमतांबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.
राज्यात दरवर्षी ११ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नुकतीच १५ हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली. या घोषणांनुसार नसली तरी सध्या तुलनेने मोठय़ा संख्येने पोलिसांची भरती सुरू आहे. त्यांना राज्यातील मरोळ (मुंबई), नानवीज (दौंड), बाभूळगाव (लातूर), नागपूर, जालना, सोलापूर, खंडाळा, अकोला या आठ पोलीस प्रशिक्षण विद्यालयांमध्ये प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यापैकी नागपूर आणि खंडाळा येथे मुलींना प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय सांगली व धुळे येथे आणखी दोन प्रशिक्षण विद्यालये उभी राहात आहेत. प्रत्येक ठिकाणी साधारणत: ९०० ते १२०० जवानांच्या भरतीची क्षमता आहे. प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी साडेतीन महिने प्रशिक्षण आणि या विद्यालयांमध्ये साडेपाच महिन्यांचे असे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण या जवानांना दिले जाते.
या विद्यालयांमध्ये प्रति ३० ते ३५ जवानांसाठी एक प्रशिक्षक, तर २५ ते ३० महिला जवानांसाठी एक प्रशिक्षक नेमण्यात येतो. शारीरिक क्षमतेच्या प्रशिक्षणाच्या वेळी सुरुवातीला जवानांना कष्टप्रद प्रशिक्षण दिले जाते आणि जवानांनी सवलती मागितल्या की त्यांच्याकडून या प्रशिक्षकांमार्फत पैसे गोळा केले जातात. विविध विद्यालयांनुसार प्रत्येकी ३०० ते एक हजार रुपयांपर्यंत ही रक्कम वसूल केली जाते. ही माहिती बाहेर न बोलण्याबाबत ताकीदही दिली जाते. याशिवाय कायदा, सीआरपीसी, आयपीसी, पोलीस प्रशासन या विषयांबाबत जे ‘इनडोअर’ प्रशिक्षण देण्यात येते. त्यात उत्तीर्ण करण्यासाठीसुद्धा पसे घेतले जातात, अशी माहिती प्रत्यक्ष जवानांनीच ‘लोकसत्ता’ला दिली. मुंबईवरील २६ नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर जवानांना २१ दिवसांचे कमांडो प्रशिक्षण दिले जाते, पण या प्रशिक्षणाच्या दरम्यानही सवलत मिळविण्यासाठी प्रत्येक जवानाकडून पाचशे रुपये घेतले जातात. त्यामुळे दर्जेदार प्रशिक्षणाची मनापासून इच्छा असलेल्या जवानांची कुचंबणा होते. या गैरप्रकारांचा परिणाम म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक जवानांना नीटपणे रायफलही चालविता येत नाही. याबाबत जवानांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना संताप व्यक्त केला. अशा हप्त्यांबरोबरच प्रशिक्षकांना खुश करण्यासाठी ‘पाटर्य़ा’वरही शेकडो रुपये उडवावे लागतात. अशा व इतरही अनेक गैरप्रकारांना तोंड द्यावे लागत असल्याची कैफियत जवानांनी मांडली.                   

ना वीज, ना पाणी म्हणजे ‘नानवीज’!
पोलीस प्रशिक्षण विद्यालयांच्या दर्जाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुणे जिह्य़ातील दौंडजवळील नानवीज येथील  विद्यालयासाठी पंधरा वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरणातर्फे जलवाहिनी मंजूर झाली आहे. पण प्रत्यक्षात त्याचे पाणी विद्यालयाला मिळत नाही. परिणामी वर्षभर टँकरनेच पाणी पुरवावे लागते. परिसरातील भूजलाच्या प्रदूषणामुळे असे दूषित पाणीच जवानांना प्यावे लागते. विजेची व्यवस्थासुद्धा पुरेशी नाही. त्यामुळे नानवीज येथील विद्यालयाचे वर्णन ‘ना वीज ना पाणी’ असे केले जाते.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या

दिनदर्शिका

मंगळवार, ९ फेब्रुवारी २०१०. भारतीय सौर २० माघ १९३१. मिती माघ वद्य एकादशी २१ क. ५१ मि. मूळ नक्षत्रे ३० क. ५७ मि. धनुचंद्र. सूर्योदय ७।११, सूर्यास्त ६।३५. विजयादशमी.
मेष : दिलासा मिळेल. वृषभ : अडचणी येतील. मिथुन : मार्ग सापडतील. कर्क : दगदगीचा संभव. सिंह : चर्चा उपयुक्त ठरतील. कन्या : कामात गुप्तता ठेवा. तूळ : तडजोडीचे धोरण ठेवा. वृश्चिक : संकल्प सिद्धीस न्याल. धनू : हुशारीने वागा. मकर : जिद्द कायम ठेवा. कुंभ : वेळ मारून न्या. मीन : यशस्वी व्हाल.
शुभराशी : मिथुन, सिंह, मीन.