मुखपृष्ठ >> महत्वाच्या बातम्या >> धान्यापासून मद्यार्क बनविणाऱ्यांचा परवाना रद्द करणार
 


स्पर्धेचे नियम व अटी




धान्यापासून मद्यार्क बनविणाऱ्यांचा परवाना रद्द करणार Bookmark and Share Print E-mail
नागपूर ११ डिसेंबर/ प्रतिनिधी
धान्यापासून मद्यार्क निर्मिती करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधान परिषदेत दिले. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. धान्यापासून मद्यार्क निर्मिती केल्यास अन्नधान्याचा तुटवडा होऊ शकतो व त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. धान्यापासून मद्यार्क निर्मिती करण्यासाठी शासनाने काही कारखान्यांना परवानगी सुद्धा दिली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर शासनाच्यावतीने निवेदन करताना गृहमंत्री आर.आर. पाटील म्हणाले की, खाण्यायोग्य धान्य या मद्यार्क साठी वापरण्यात येणार आहे. सडके किंवा गुरेही न खाणाऱ्या धान्यापासून मद्यार्क तयार करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, राज्यात आणि देशात अन्न धान्याचा तुटवडा बघता शासन याबाबत फेरविचार करेल व ज्या कारखान्याला परवानगी दिली असले त्यांचे परवानेही रद्द केले जाईल, असे पाटील यांनी  यावेळी स्पष्ट केले.   
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.