मुखपृष्ठ >> महत्वाच्या बातम्या >> दीड कोटी पाण्यात..
 


स्पर्धेचे नियम व अटी




दीड कोटी पाण्यात.. Bookmark and Share Print E-mail
मुंबईसाठीचे डॉप्लर रडार दिल्लीकडे!
अभिजित घोरपडे , मुंबई, ८ जानेवारी
मुंबईतील पावसाच्या अचूक अंदाजासाठी बसविण्यात येणारे ‘डॉप्लर रडार’ तब्बल सहा महिने कुलाबा वेधशाळेत धूळ खात पडल्यानंतर पुन्हा दिल्लीकडे पाठविण्यात आले. हे अत्याधुनिक रडार बसविण्यासाठी झालेला दीड कोटी रुपयांहून अधिक खर्च मातीत गेला आहे. त्यामुळे पैशापायी पैसे गेले तरीही मुंबई रडारविनाच उरली आहे.विशेष म्हणजे अत्याधुनिक डॉप्लर रडार बसविण्यासाठी आधीचे साधे रडार काढण्यात आले, पण आता त्या जागी नवे अत्याधुनिक रडार न बसल्याने मुंबईत येता पावसाळा कोणत्याही रडारविनाच जाण्याची शक्यता आहे. मुंबईत बसवायचे डॉप्लर रडार चिनी बनावटीचे असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्याला मुंबई नौदलाच्या परिसरातील जागा नाकारण्यात आली असल्याचे समजते. पण या बाबींचा आधी विचार न झाल्याने दीड कोटींचा चुराडा झाला आहे.
मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुरामुळे हवामानाचा अंदाज सुधारण्याचे प्रयत्न करावयाचे ठरले. त्याचाच एक उपाय म्हणून मुंबईसाठी खास ‘डॉप्लर रडार’ बसविणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार गेल्या पावसाळ्यात रडार बसणे अपेक्षित होते. त्यानुसार चिनी बनावटीच्या रडारचे सुटे भाग एप्रिल महिन्यात पोहोचलेसुद्धा. मात्र, ते बसविण्याची तयारी पूर्ण न झाल्याने संपूर्ण पावसाळ्यात या रडारचे भाग मुंबईतील कुलाबा वेधशाळेच्या आवारात पडून होते. त्यानंतर ते बसविण्यासाठी तयारी सुरू झाली. नेव्हीनगरमध्ये असलेल्या अर्चना इमारतीत आधीचे साधे रडार होते. त्याजागीच नवे डॉप्लर रडार बसविण्याचे ठरले. पण डॉप्लर रडारचे वजन आधीच्या रडारच्या तुलनेत खूपच जास्त (सुमारे १३ टन) असल्याने त्यासाठी अर्चना इमारतीच्या रचनेत सुधारणा करण्यात आल्या. हे काम गेल्याच महिन्यात पूर्ण झाले. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय नौदलाला द्यावयाची रक्कम, रडारसाठी डिझेल जनरेटर, यूपीएस, रडारचे भाग आणण्याचा व त्यावरील कराची रक्कम, आधीचे रडार काढण्याचा खर्च असे एकूण दीड कोटी रुपये हवामान विभागाला खर्च करावे लागले.
हे रडार चिनी बनावटीचे असल्याने त्याला व ते बसविण्यासाठी येणाऱ्या चिनी अभियंत्याला नौदलाच्या संवेदनशील क्षेत्रात प्रवेश मिळणार का, याचा विचार न करताच सर्व खर्च केला गेला. रडार बसविण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही चिनी रडार व त्यांच्या अभियंत्याला संवेदनशील परिसरात प्रवेशाची परवानगी नौदलाकडून नाकारण्यात आली. त्यामुळे हे रडार मुंबईत न बसविताच गेल्या २१ डिसेंबर रोजी दिल्लीकडे पाठविण्यात आले. त्यामुळे आता मुंबईसाठी आधीचे साधे रडारही नाही आणि डॉप्लर रडारही नाही. नवे कोणतेही रडार या पावसाळ्यापर्यंत उभे राहण्याची शक्यता कमीच असल्याने हा पावसाळा रडारविनाच जाणार आहे. (पूर्वार्ध)
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.