|
|
|
वाढत्या महागाईच्या मुद्दय़ावरून काँग्रेसच्या पवारांना ‘कानपिचक्या’
|
|
|
|
|
नवी दिल्ली, ८ जानेवारी/विशेष प्रतिनिधी
‘केवळ समस्या अधोरेखित करणे हीच सरकार आणि मंत्र्यांची जबाबदारी नसून त्यांच्यावर तोडगा काढून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचेही त्यांचे कर्तव्य आहे,’ अशा शब्दात आज काँग्रेसने वाढत्या महागाईस ‘जबाबदार’ ठरलेले केंद्रीय कृषी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री शरद पवार यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले. प्रत्येक आठवडय़ागणित जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडत असल्यामुळे काँग्रेस हायकमांड बिथरली असल्याचे आज स्पष्ट झाले.
गेल्या अकरा वर्षांचा उच्चांक गाठणाऱ्या महागाईसाठी अपुरा मान्सून आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाववाढीला कारणीभूत ठरविले जात असले तरी महागाईस आवर घालण्यास मंत्री म्हणून शरद पवार पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांच्यामुळे काँग्रेसची ‘आम आदमी’ची घोषणा आता हास्यास्पद ठरली असल्याचे मत काँग्रेसचे नेते व्यक्त करीत आहेत. उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाईचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला जाणार असून केंद्र सरकारच्या वतीने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता आज वर्तविण्यात आली. पंतप्रधान मनमोहन सिंग गुरुवारी कोलकाता येथे अत्यवस्थ ज्योती बसू यांना बघण्यासाठी गेल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक स्थगित करण्यात आली होती. डाळी, साखर, गहू, तांदूळ, तेल, दूध, फळभाज्यांचे दर भूतो न भविष्यती वाढल्यामुळे काँग्रेस पक्ष अस्वस्थ झाला आहे. महागाईसाठी पवार यांची धोरणे जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढणाऱ्या काँग्रेसने आजवर याबाबतीत बराच संयम दाखविला. प्रत्येकवेळी भाववाढ होणार, असा इशारा देणारे पवार यांच्याविषयी विचारले असता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी त्यांच्यावर थेट शरसंधान केले. केवळ समस्यांची जाणीव करून दिल्याने सरकार आणि मंत्र्यांची जबाबदारी संपत नसून समस्यांवर तोडगा काढून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचेही त्यांचे काम आहे, असे द्विवेदी पवार यांच्याविषयी बोलताना म्हणाले. महागाईला आवर घालण्यासाठी सरकारने अल्पावधी व दीर्घावधीची रणनिती आखली पाहिजे, असेही ते म्हणाले. महागाईच्या मुद्यावर सरकारचे व्यवस्थापन अपयशी ठरल्याचीही कबुली त्यांनी अप्रत्यक्षपणे दिली.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|