|
|
|
मंत्र्यांची दालने चकाचक करण्यावर कोटय़वधींची उधळपट्टी!
|
|
|
|
|
मुंबई, १२ जानेवारी/खास प्रतिनिधी
राज्यावरील कर्जाचा बोजा एक लाख ८० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढल्यानंतरही हा कर्जाचा बोजा कसा कमी करावा तसेच शासनाच्या योजना जनतेपर्यंत कशा पोहोचतील याची चिंता करायच्या ऐवजी मंत्रालयातील आपल्या दालनांचे सुशोभीकरण करण्याच्या कामालाच बहुतेक मंत्र्यांनी प्राधान्य दिले आहे.
एकूण २१ मंत्र्यांच्या दालनाच्या सुशोभीरणासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून काही मंत्र्यांच्या दालनातील उंची सोफे व फर्निचर मंत्रालयामागील मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले आहे. दालन सुषोभित केल्यामुळे मंत्र्यांची गुणवत्ता वाढून जनतेची कामे ते प्रभावीपणे करणार आहेत का, असा सवालही मंत्रालयात केला जाताना दिसतो. राज्यात १९९९ पासून आघाडीचे सरकार असून यापूर्वीही मंत्र्यांच्या दालनाचे सर्वार्थाने नुतनीकरण करण्यात आले होते. मात्र नव्याने आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर बहुतेक मंत्र्यांनी आपल्या दालनाचे नुतनीकरणाचे काम हाती घेतले. यातील अनिल देशमुख यांच्या दालनाच्या नुतनीकरणावर प्रचंड खर्च करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा त्यांच्या दालनाच्या नुतनीकरणाचे काम सुरू झाले. जवळपास ११ मंत्र्यांच्या दालनाच्या नुतनीकरण काम सध्या सुरू असून यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय आणखीही काही मंत्र्यांच्या दालनाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव असून यापोटी सुमारे पाच कोटी रुपये खर्च येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. बहुतेक मंत्र्यांची दालने ही सुशोभीत असतानाही दालनातील चांगले फर्निचर व सोफे काढून फेकण्यात आले आहेत. मुळात जनतेच्या कामांसाठी हे मंत्री मंत्रालयात कितीवेळ वर्षांकाठी असतात याचीही हिषेब एकदा होणे आवश्यक असल्याचे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचेच म्हणणे आहे. मंत्र्यांकडून वसूल करण्याचा मुंबई भाजपचा निर्धार महाराष्ट्रावर एक लाख ९० हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना राज्यातील मंत्री मंत्रालयातील आपल्या दालनांवर कोटय़वधी रुपये खर्च करावयास लावत असल्याचा मुंबई भाजपने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा पैसा मुंबई भाजप मंत्र्यांकडून वसूल करावयास लावेल, असा इशारा भाजपने दिला आहे. राज्यातील गरीब जनतेला खाण्यासाठी अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही, बेरोजगारी आणि महागाई वाढत असताना राज्यातील मंत्री आपल्या दालनांवर जनतेच्या पैशांची उधळपट्टी करतात, ही निंदनीय बाब आहे. विशेष म्हणजे दालनांवर खर्च करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने असमर्थता दर्शवली असताना मंत्री खर्च करीत असल्याचा मुंबई भाजपचे अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी एका पत्रकान्वये निषेध केला आहे. अनिल देशमुख - १३ लाख रुपये, नितीन राऊत - नऊ लाख रुपये (राऊत यांनी त्यापूर्वी १९ लाख रुपये खर्च केला होता), अब्दुल सत्तार - १५ लाख रुपये, विजय वडेट्टीवार - १५ लाख रुपये, फौजिया खान - १२ लाख रुपये, रमेश बागवे - ९.५० लाख रुपये, सुरेश शेट्टी - २० लाख रुपये, नसीम खान - १२ लाख रुपये, लक्ष्मण ढोबळे - १६ लाख रुपये अशी मंत्र्यांच्या दालनावरील खर्चाची आकडेवारी आहे, असे भाजपने म्हटले आहे.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|