|
|
|
वसई पोलिसांच्या चौकशीचे आदेश
|
|
|
|
|
नंदकुमार जावळे, मुंबई, ६ मार्च
वसई-विरार महानगरपालिकेतून ५३ गावे वगळण्याच्या मागणीचा एक सदस्य आयोगाकडून चौकशी करून निर्णय देण्याचे मान्य करूनही राज्य सरकारने हा विषय प्रलंबित ठेवला. त्यामुळे गेल्या आठवडय़ात आमदार विवेक पंडित यांच्या जनआंदोलन समितीने पुन्हा आंदोलन छेडले. काल पंडित यांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आणि पोलिसांनी पंडित यांना उचलून सरळ ठाण्याच्या सिव्हील इस्पितळात दाखल केले.
आमदार पंडित यांना नेण्यास विरोध करणाऱ्या तसेच त्यांना सक्तीने उपोषणातून परावृत्त करण्याच्या कृतीविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना काल पोलिसांनी गुरा-ढोरांसारखे झोडपून काढले. याची तीव्र प्रतिक्रिया पुन्हा तालुक्यात उमटली. आमदार पंडित आणि जनता दल (से.) निर्भय जनमंच यांच्या तक्रारींची दखल आज गृहमंत्र्यांनी घेऊन कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक परमवीर सिंह यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने हरित वसई भकास करण्याच्या उद्देशाने वसई-विरार महानगरपालिकेतून ५३ गावे वगळण्याकडे दुर्लक्ष करून महानगरपालिकेचे कामकाज पुढे रेटले म्हणून जनआंदोलन समितीने भाजप, सेना, मनसे, गावे बचाव आंदोलन, निर्भय जनआंदोलन समिती यांच्या एकत्रित प्रयत्नांनी पुन्हा आंदोलन छेडले. काल हे आंदोलन चिरडून काढण्यासाठी अबाल-वृद्ध- स्त्री-पुरुषांना पोलिसांनी झोडपून काढले, अगदी घरा-घरांत घुसून स्त्रियांना, मुलींना मुलांनाही फोडून काढले याविषयी आमदार विवेक पंडित यांनी, तसेच जनता दलाचे प्रभाकर नारकर यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रारी केल्या त्याची दखल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेऊन सखोल चौकशीचे आदेश परमवीर सिंह यांना आज दिले. परमवीर सिंह यांनी तालुक्यात दाखल होऊन कामाला सुरुवात केली आहे. आज दिवसभर तालुक्यातील वातावरण तणावपूर्ण होते. दरम्यान, वसईतील तणाव निवळण्यासाठी पंडित यांनी सिव्हील इस्पितळात उपोषण मागे घेताच थेट वाघोली परिसराला भेट दिली. चार दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खालावली असूनही अॅम्ब्युलन्समधूनच काल रात्री त्यांनी वसईतील विविध भागात जाऊन पोलीस लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेतली. विशेषत: पोलिसांनी लक्ष्य केलेल्या वाघोलीतील रहिवाशांना भेटून त्यांनी दिलासा दिला.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|