|
|
|
मोबाइल इंटरनेटचे महत्त्व वाढणार-संजीव लाटकर
|
|
|
|
|
मुंबई, ६ मार्च /प्रतिनिधी येत्या काही वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी असलेले संगणकाचे महत्त्व कमी होईल आणि मोबाईलवरच इंटरनेट अधिक प्रमाणात पाहिले जाईल, असे भाकित ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी शुक्रवारी दादर येथे व्यक्त केले.
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात लाटकर यांच्यासह संगणक अभियंते अतुल तुळशीबागवाले, ‘मिसळपाव डॉट कॉम’चे तात्या अभ्यंकर, ब्लॉगलेखक द्वारकानाथ बिवलकर ऊर्फ रामदास हे सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन माधव शिरवळकर यांनी केले. आगामी काही वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी संगणकापेक्षाही मोबाइलला जास्त महत्त्व येईल. कदाचित संगणकावर हाताने टाइप करणे ही संकल्पनाही मोडीत निघेल. आपण जे बोलू ते स्वयंचलितपणे संगणकावर टाइप होईल तसेच जो मजकूर असेल तो आपल्याला वाचताही येऊ शकेल, असे तंत्रज्ञान येऊ शकते, असे लाटकर म्हणाले. एखादे संकेतस्थळ सुरू होते, मात्र त्यात नावीन्यता किंवा कल्पकता नसेल तर ते अल्पावधीतच बंद पडते. त्यामुळे संकेतस्थळामध्ये कल्पकता महत्त्वाची आहे, असे सांगून लाटकर म्हणाले की, मराठीत तरी केवळ संकेतस्थळाच्या मदतीने पैसे कमावता येत नाहीत. एखादा उद्योग किंवा व्यवसाय असेल तर त्याला पूरक म्हणून संकेतस्थळाचा चांगला उपयोग होऊ शकतो. ‘युनीकोड’च्या वापरामुळे मराठीत अनेक नवीन संकेतस्थळे तयार होत असून मराठी वाचण्यासाठी युनीकोड हा सशक्त पर्याय असल्याचे मत अतुल तुळशीबागवाले, तात्या अभ्यंकर, रामदास यांनी व्यक्त केले. इंटरनेटसाठी अत्यावश्यक असलेले ‘ब्रॉडब्रॅण्ड’ अद्यापही दोन ते तीन टक्के लोकांपुरतेच मर्यादित आहे. त्याचा प्रसार जितक्या जास्त प्रमाणात होईल तेवढे आपल्याकडेही इंटरनेट, ब्लॉग आणि संकेतस्थळांचे महत्त्व वाढेल. शालेय स्तरावर लहानपणापासूनच ‘ई-लर्निंग’ ची सुरुवात आता आपल्याकडे होत असल्याचे लाटकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.मराठीत आज अनेक ब्लॉगलेखक असून ते पाककृती, कविता, प्रवासवर्णन, कथा, छायाचित्रण आदी विविध विषयांवर उत्तम लेखन करत असल्याचे मत तात्या अभ्यंकर यांनी व्यक्त केले तर आपल्याकडील ब्लॉग आणि त्यातील लेखन हे बाल्यावस्थेच्याही आधीच्या अवस्थेत असून काही वर्षांपूर्वी आपल्याकडे अनियतकालिकांची जशी चळवळ सुरू झाली होती, तसे आजच्या ब्लॉगचे स्वरूप असल्याचे मत लाटकर यांनी व्यक्त केले.परदेशात ज्याप्रमाणे व्यावसायिक ब्लॉगलेखक आहेत आणि ते आपले उत्पन्न ब्लॉग लेखनातून मिळवतात तसा प्रकार अद्याप मराठीत नाही, असे तुळशीबागवाले यांनी सांगितले. तर परदेशात ब्लॉग लेखनावरील पुस्तके प्रकाशित झाली असून तिकडे त्या लेखनासाठीचे ब्लुगर पुरस्कारही देण्यात येत असल्याचे शिरवळकर म्हणाले.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|