मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> रवींद्र दाणी यांच्या ‘मिशन काश्मीर’चे बुधवारी सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशन
 


स्पर्धेचे नियम व अटी




रवींद्र दाणी यांच्या ‘मिशन काश्मीर’चे बुधवारी सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशन Bookmark and Share Print E-mail
नागपूर, १७ जून/ प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार रवींद्र दाणी यांनी लिहिलेल्या ‘मिशन काश्मीर’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी, २३ जूनला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.
सिव्हील लाईन्स येथील देशपांडे सभागृहात सायंकाळी ५.४५ वाजता होणाऱ्या प्रकाशन समारंभाला जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल लेफ्ट. जनरल (निवृत्त) एस.के. सिन्हा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंजू हेमेटॉलॉजी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अवतार कृष्ण गंजू राहतील. पुण्याच्या  अमेय प्रकाशनतर्फे ‘मिशन काश्मीर’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत असून त्याला जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल लेफ्ट. जनरल (निवृत्त) एस.के. सिन्हा यांची प्रस्तावना आहे. चारशेपेक्षा अधिक पृष्ठ संख्या असलेल्या या पुस्तकात काश्मीर समस्येशी संबंधित विविध पैलू उलगडण्यात आले आहेत. १९४७ या वर्षीपासून सुरू झालेल्या आणि ४३१ दिवस चाललेल्या भारत पाक संघर्षांचा तपशील हे या पुस्तकाचे खास वैशिष्टय़ आहे. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनी २३ जूनला होणाऱ्या पुस्तक प्रकाशन समारंभाला नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमेय प्रकाशनचे संचालक उल्हास लाटकर आणि श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे यांनी केले आहे.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.