‘आरोग्य मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा’ Print
पाली, ४ जानेवारी/ वार्ताहर
वाडय़ा, वस्ती डोंगर- कपारीत वसलेल्या सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने जिल्हा परिषद आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र पाली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आयोजित केलेल्या आरोग्य मेळाव्याचा लाभ घेऊन आपल्या प्रकृतीबाबत चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन आमदार धैर्यशील पाटील यांनी केले.
आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रा. जि. मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, सभापती संजय परदेशी, उपसभापती राम शीद, जि. प. सदस्य हिरामण गायकवाड, पं. स. सदस्या भारती शेळके, गटविकास अधिकारी विनय म्हात्रे, विजय काटकर, उत्तमराव देशमुख, अपर्णा साखरले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यापूर्वी मिळणाऱ्या सोयी-सुविधांपेक्षा बराच बदल झाला असून, अत्याधुनिक तपासणी यंत्रणा व रुग्णांसाठी गरजेच्या आवश्यक असणाऱ्या सोयी- सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील जनतेने त्यांचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील पहिले आयुर्वेदिक कक्षाची सुरुवात पाली येथील प्रा. आ. केंद्रात झाली. या उपचार पद्धतीकडेही रुग्णांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लाभ घ्यावा. उत्तमप्रकारे रुग्णांची सेवा, सुविधा विविध आरोग्य मेळावे घेऊन प्रगतीत असलेल्या प्रा. आरोग्य केंद्राचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी व डॉ. विनोद जैयस्वाल आणि सर्व सहकाऱ्यांचे कौतुक खैरे यांनी केले. सभापती संजय परदेशी, अरिफ मण्यार, गणपत सीतापराव, गटशिक्षणाधिकारी जनाबाई काळे, सौ. बेलोसे, रमेश खरे, त्याचप्रमाणे डॉ. अभिजीत पिंगळे, डॉ. शिवाजी धुमणे, डॉ. मंगला शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.    
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."