| सटाणा महाविद्यालयात आबासाहेब सोनवणे पुण्यतिथीचा कार्यक्रम |
|
|
सटाणा / वार्ताहर येथील महाविद्यालयात ना. म. तथा आबासाहेब सोनवणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आबासाहेबांच्या कार्यास उजाळा देण्यात आला. शिक्षण हे साध्य नसून साधन आहे, असे व्रत आबासाहेबांनी अंगीकारले. मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान होते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त उपप्राचार्य बी. जे. शेवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे हे होते. यावेळी धोंडगे यांनी महाविद्यालयात शैक्षणिक गुणवत्तेमुळे ३९०० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचा आपणास सार्थ अभिमान आहे, असे सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रदीप कुमार शहा, प्रा. एस. बी. खैरनार यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विलास देवरे यांनी केले |