योजना डेहणकर यांनी चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. शासकीय तंत्रनिकेतनातून इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स या विषयात पदविका प्राप्त केल्यानंतर त्यांनी कॉम्प्युटर सायन्स या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. मात्र चित्रकलेच्या ओढीने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. अखेरीस इंजिनीअरिंगमधील प्राध्यापकी सोडून त्यांनी चित्रकलेचाच मार्ग निवडला. अलीकडेच अनेक प्रदर्शनांतून त्यांनी त्यांची चित्रे प्रदर्शित केली. तैलरंग, जलरंग आदी सर्व माध्यमांमध्ये त्या चित्रण करतात. निसर्गदृश्य हा त्यांच्या आवडीचा विषय आहे.
योजना डेहणकर