जे. एस. पी. गोविंद यांच्या शिल्पकृतींचा उल्लेख ‘कचऱ्यातून कला’ असाही करता येईल. धातूच्या वस्तू निरुपयोगी झाल्या की, आपण भंगारामध्ये काढतो. या भंगारातील धातूच्या गोष्टींना नानाविध आकार असतात. याच आकारांचे एकत्रीकरण करून एखादी कलाकृती तयार करता येऊ शकते का, असा विचार अनेकदा शिल्पकार करतात. मग त्यांच्या डोक्यातील आकार आणि प्रत्यक्षातील जोडकाम यातून काही वेळेस अशा चांगल्या कलाकृती तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात.