अक्षरांकन म्हणजे केवळ अक्षरेच असे समजण्याच्या पलीकडे आताचा जमाना गेला आहे. शिवाय आताचे अक्षरांकनकार चित्राच्या तोडीस ते अक्षरांकन नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच चित्रकारांपैकी एक म्हणजे राम कस्तुरे. अक्षरांमधील केवळ रूपाकार नव्हे, तर रंग, रूप, रेषा, खोली, पोत आदी सर्व निकष घेऊन अक्षरांकन उतरते तेव्हा अनेकदा ते चित्राच्या जवळपास पोहोचते.