चित्रकाराला कळावे लागते की, समोर दिसणाऱ्या दृश्यामध्ये नेमके चित्र कुठे आहे ते. म्हणजेच समोर विविध गोष्टी दिसत असतात, त्यातील नेमक्या कोणत्या गोष्टी या चित्रासाठी आवश्यक आहेत, ते समजून घेऊन जो चित्रण करतो, तो चांगला चित्रकार. निसर्गदृश्याच्या बाबतीत अनेकदा चित्रकारांचा गोंधळ होतो, समोर दिसणारी प्रत्येक बाब चित्रकार बारकाईने चितारण्याचा प्रयत्न करतो. हुबेहूब चित्रण म्हणजे चांगले चित्रण नाही. कुडाळ हिरेमठ यांच्या या चित्रात केवळ दोनच दृश्यांवर लक्ष केंद्रित करून तेवढेच चित्रण चित्रकाराने केल्याने ते परिणामकारक ठरते. शिवाय त्यात रचनेचेही चांगले प्रयोग चित्रकाराने केले आहेत.