व्यक्तिचित्र असे म्हटले की, कुणा तरी एका व्यक्तीचा चेहरा, त्यावर विलसणारे हास्य अशीच चित्रे बहुतांश पाहायला मिळतात. खरे तर व्यक्तिचित्र म्हणजे त्या व्यक्तीच्या भावनांचे आणि गुणवैशिष्टय़ांचेही दृश्य पद्धतीने घडविलेले दर्शनच असते. चिन्मया पांडा यांच्या प्रस्तुत व्यक्तिचित्रात म्हातारीच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, तिच्या डोळ्यांतील भाव या चित्राला एक वेगळी खोली प्राप्त करून देतात. महत्त्वाचे म्हणजे तिने थेट चित्रकाराकडे न पाहणे, यामुळे चित्राला एक चांगली अनौपचारिकता प्राप्त झाली आहे.