० एकटय़ा पालकाने मुलांना सांभाळताना सर्वप्रथम आपण एकटे असल्याची भावना आपल्या मनातून काढून टाकावी.
० आपले लक्ष मुलांभोवती केंद्रित करा. त्यांना आनंदी ठेवा. त्यांना असाह्यतेची किंवा एकटेपणाची जाणीव होऊ देऊ नका.
० त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्या दंगामस्तीत सहभागी होणे, सुट्टीमध्ये त्यांच्याबरोबर बाहेर जाणे हे सगळे न कंटाळता किंवा न चिडता करा.
० आपल्या मुलांचे घरातील वागणे, शाळेतील वर्तणूक, स्कूलबसमधील मित्रांशी वागणे, शेजारच्या लोकांशी वागणे, नातेवाईकांशी वागणे यावर लक्ष ठेवा. त्यांची मन:स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.
० कधी कधी मुलांना मामा-मावशी, आजी-आजोबा, इतर नातेवाईक, मित्र – मैत्रिणींकडे घेऊन जा. त्यांनाही आपल्या घरी बोलवा. त्यांच्याबरोबर सहलीला जा. मुलं कायम आनंदात रहायला हवीत.
० मुलांना सहलीला घेऊन जाताना माहीत असलेल्या ठिकाणी किंवा आपल्या संपर्कातील व्यक्तींनी सांगितलेल्या ठिकाणांची निवड करा. त्या भागाची, तेथील राहण्याच्या व्यवस्थेची, सोयीसुविधांची, प्रवास, प्रेक्षणीय स्थळे याची नीट माहिती करून घ्या. म्हणजे तेथे गेल्यावर गोंधळ उडणार नाही.
० मुलांना घेऊन एकटय़ाने लांबचा प्रवास करावयाचा असल्यास प्रवासी कंपनीची निवड करा. अशा काही ट्रॅव्हल एजन्सीज आहेत की ज्या सिंगल पेरेंटसाठीही टूर नियोजित करतात.
० परदेशांत प्रवासाला जाणार असल्यास स्वत:चा व मुला/मुलीचा पासपोर्ट अपडेट करून घ्या. विभक्त किंवा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असेल किंवा मुला/मुलीचा ताबा तुमच्याकडे असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा म्हणजे परदेशात किंवा तपासणी करताना त्रास होणार नाही. तसेच मूल दत्तक असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रेही जवळ बाळगावीत.
० प्रवासाला जाताना मुला/मुलीचा नुकताच काढलेला फोटो सोबत घ्या. नाव व घरचा, शाळेचा पत्ता असलेले कार्ड स्वत:चा किंवा जवळच्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकासह मुला/मुलीला देऊन ठेवा.
० स्वत:ला किंवा मुला/मुलीला काही शारीरिक त्रास असल्यास योग्य ती औषधे किंवा वैद्यकीय माहितीपत्र जवळ ठेवा.
० प्रवासात त्रासदायक होईल इतके सामान सोबत घेऊ नका. सामान घेताना बॅग-पॅक किंवा ट्रॉलीचा वापर करा म्हणजे वेळ पडल्यास मुलंही ते उचलू शकतील.
० प्रवासात योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत हॅन्डबॅगेत ठेवा. मूळ कागदपत्रेही सोबत ठेवा.
० तुम्ही जाणार असलेल्या ठिकाणाच्या मुक्कामाची माहिती व मोबाइल क्रमांक आपल्या जवळच्या व्यक्तीकडे देऊन ठेवा.
० अचानक काही समस्या आल्यास कसे वागावे, कोणाची मदत घ्यावी यासंबंधीची माहिती मुलांना देऊन ठेवा.
० प्रवासात खरेदी विचारपूर्वक करा. घेतलेली वस्तू इकडे आल्यावर खराब निघाल्यास पैसे अक्कलखाती जातात. तेथील आठवण म्हणून एखादी विशेष वस्तू घेता येईल. मुलांनाही याबाबत आधीच सूचना द्या म्हणजे ती हट्ट करणार नाहीत.
० स्विमिंगपूल, राईडस, वॉटरगेम्स यातील धोके लक्षात घेऊन काळजी घ्या आणि मुलांनाही या धोक्याची सूचना देऊन ठेवा.

संकलन- उषा वसंत
unangare@gmail.com

Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…