क्षयरोग म्हणजे बरा न होणारा खोकला. रोज हजेरी लावणारा ताप, घटत जाणारे वजन आणि भूक न लागणे हे असे साधारणपणे सगळ्यांना वाटत असते. बराच वेळ हिंदी चित्रपटामध्ये खोकल्यातून रक्त आले की टीबी झाला असे दाखवले जाते. त्यामुळेच सर्वसाधारणपणे लोकांना फक्त एकच क्षयरोग माहिती असतो तो म्हणजेच छातीचा (खरे तर फुप्फुसाचा) क्षयरोग. प्रत्यक्षात टीबी शरीरात कुठेही उद्भवू शकतो.  मानेतल्या वा काखेतल्या गाठींचा टीबी, मेंदूच्या आवरणाचा टीबी (Tuberculous meningitis) हाडाचा टीबी, पोटातल्या आतडय़ांचा टीबी अशा कोणत्याही अवयवांचा होऊ  शकतो. हल्ली पोटातील टीबी वारंवार दिसून येतो, म्हणूनच पोटातील आतडय़ांच्या टीबीबद्दल जाणून घेऊ.

टीबीचे मायकोबाक्टेरियम टय़ुबरक्युलम बसिलाय (Mycobacterium Tuberculum Bacilli) नावाचे जंतू असतात, ते आपल्या शरीरात विविध मार्गाने शिरू शकतात. १. श्वासोच्छ्वासाद्वारे हवेतील जंतू छातीतील फुप्फुसात शिरतात. थुंकी गिळल्यामुळे किंवा इतर मार्गातून ते पोटापर्यंत पोहोचतात. दूषित दूध व तत्सम पेयांतूनही आपल्या पोटात शिरतात.

Kiran Samant Post Viral
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंतांची माघार? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, नारायण राणेंचा मार्ग मोकळा?
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
Chandrakant Patil on Sharad Pawar
‘दिल्लीतल्या दोन नेत्यांना शरद पवारांनी झुलवत ठेवलं’, चंद्रकांत पाटील यांचा आरोप; म्हणाले, “बारामतीत त्यांचा हिशोब…”

प्रत्येकाच्या शरीरात टीबीचे हे जंतू कुठल्या ना कुठल्या मार्गाने केव्हा ना केव्हा शिरलेले असतात. म्हणून प्रत्येकाला काही टीबी होत नाही. एखाद्याची प्रतिकारशक्ती काही कारणास्तव कमी होते वा बिघडते त्यावेळीच त्या व्यक्तीला टीबीच्या जंतूमुळे विकार होतो. पोटातील आतडय़ांना टीबी होण्याचेही हेच कारण आहे. टीबीचे जंतू पोटात शिरल्यावर आतडय़ांच्या आतील आवरणावर चिकटून खाऊ लागतात. त्यामुळे या आवरणावर जखम (व्रण) होते. आतडय़ांच्या त्या भागाला सूज येते. बऱ्याच कालावधीनंतर किंवा टीबीचे औषध सुरू केल्यानंतर ही जखम बरी होऊ लागते. पण जखम बरी झाल्यावर जखमेच्या जागी आतडे आकसल्याप्रमाणे होते. म्हणजे त्या जागी आतडय़ांतला मार्ग अरुंद होतो. पुढे तिथे अन्न अडकून कधी कधी आतडे फुटण्याची (Perforation) होण्याची शक्यता असते.

आतडय़ांचा टीबीची लक्षणे

१.     वारंवार होणारी पोटदुखी, बहुतेक करून जेवल्यानंतर दुखणे वा दुखणे वाढत जाणे.
२.     पोटदुखीच्या वेदना असह्य़ होऊन नंतर उलटय़ा सुरू होतात.
३.     सुरुवातीला वारंवार शौचाला होणे, पातळ होणे.
४.     बारीक बारीक ताप येणे, वजन घटत जाणे.
५.     भूक मंदावणे.
६.     आतडे अरुंद झाल्यास पोटास फुगारा धरणे. (Distension) वा पोट फुगणे.

पोटाच्या टीबीसाठी तपासण्या

१) रक्त तपास : हिमोग्लोबीन कमी होते व काही विशिष्ट पेशींची वाढ होते.
२) छातीचे एक्स-रे : टीबीचा पॅच दिसतो.
३) पोटाची सोनोग्राफी : यामध्ये पोटात पाणी होणे, गाठी वाढणे.
४) पोटाचा बेरियम तपास : यामध्ये रुग्णाला बेरियम नावाचे औषध प्यायला देऊन ते आतडय़ांत पुढे पुढे सरकताना वेगवेगळ्या वेळी अनेक एक्स-रे घेऊन आतडय़ांमध्ये कुठे जखम आहे का, कुठे अडथळा आहे का, हे पाहिले जाते.
५) सीटी स्कॅन : आतडय़ांबरोबर पोटातील लिम्पनोडच्या गाठीमध्ये आजार आहे का, याचे निदान करण्यात येते. तसेच आतडे अरुंद झाले आहे का ते कळते.
६) दुर्बिणीचा तपास :  एन्डोस्कोपी

किंवा लॅप्रोस्कोपी या दुर्बिणीतून पोटाच्या आतल्या भागांची तपासणी करून जर एखादा आतला भाग संशयास्पद असेल तर त्याचा तुकडा काढून तपासास पाठवला जातो.

पोटाचा क्षयरोग निदान

प्राथमिक अवस्थेत क्षयरोगाचे निदान सहसा करताही येत नाही. लसिका ग्रंथी फुप्फुसाचा क्षयरोग असे निदान करणे जास्त सोपे जाते. वर सांगितल्याप्रमाणे आपल्या देशात क्षयजंतूबाधा लहानपणीच झाल्याने त्याविरुद्ध कार्य करणारी प्रतिकारशक्तीही शरीरात असते. त्यामुळे पोटाचा क्षयरोग जास्त वेगात पसरत नाही. लक्षणे व खुणाही तितक्याशा सूचक नसतात. ताप येतोच असे नाही.

पोटाच्या क्षयरोगाची लक्षणे संभ्रम निर्माण करतात. कारण प्राथमिक अवस्थेत फक्त मुरडा येणे, पोट दुखणे, गॅसेस होणे, क्वचित शौचात रक्त जाणे अशी लक्षणे असतात. जंत व आमांशाची लक्षणे याच प्रकारची असल्याने व ९० लोकांना हा प्रादुर्भाव असल्याने निदान प्रक्रिया लांबणीवर पडते. अशा वेळी सर्व तपासण्या नॉर्मल येतात. परंतु काही काळानंतर आजार वाढल्यानंतर किंवा बायोप्सीनंतर याचे निदान शक्य होते. या आजाराचे लवकर निदान झाले नाही तर गंभीर दुष्परिणाम होऊ  शकतात, म्हणजे आतडय़ाचा परिघ कमी होऊन आतडय़ांत अडथळा किंवा व्रणाच्या जागी भोक पडून, रक्तस्राव होऊ शकतो. प्रतिकार शक्ती कमी असेल तर हा आजार वाढून जीवही दगावण्याची शक्यता असते.

उपचार :

एकदा का निदान झाले की प्रथम टीबीची औषधे द्यावीत. आतडय़ांच्या टीबीच्या जखमा लगेच बऱ्या होऊ  लागतात व पोटदुखी पळून जाते. निदान लवकर झाले तर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत व त्यामुळे आजार पूर्णपणे बरा होतो. परंतु आतडय़ांचा परिघ कमी झाला असेल, गाठ आली असेल तर औषधोपचारांबरोबर शस्त्रक्रिया करावी लागते. या अवस्थेमध्येही निदान झाले नाही तर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, म्हणजे व्रणाच्या जागी भोक पडून, रक्तस्राव झाला किंवा आतडय़ांत अडथळा निर्माण होऊन ती पूर्ण बंद झाली तर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागते.

केव्हा केव्हा आतडय़ांमधील टीबीच्या जखमा बऱ्या होताना आतडे अरुंद होत जाते (आवळले आते) त्यामुळे आतडय़ातील अन्न अडकून राहते, पुढे सरकत नाही. त्यामुळे खाल्लेले अन्न उलटीवाटे बाहेर पडते. पोटदुखी सुरू होते. टीबीची पूर्ण औषधे, योग्य काळ देऊनही पोटाचा त्रास म्हणजे पोटदुखी, पोटफुगी, उलटय़ा सुरू राहिल्या तर ऑपरेशन करायची गरज पडते.

शेवटी पोटाचा क्षयरोग असे निदान झाल्यास घाबरून जाऊ नये तर ताबडतोब योग्य ते उपचार सुरू करावेत. निदान झाल्यावर तो पूर्ण बरा होतो, हे लक्षात ठेवावे.
डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com