चिडचिड करणे हा फक्त माणसाचाच स्वभाव आहे असे नाही तर आपली आतडीदेखील माणसाप्रमाणे चिडचिड करतात. चिडल्यावर माणसे जशी आरडाओरड किंवा आदळआपट करतात तशीच आतडीदेखील काम व्यवस्थित करत नाहीत किंवा आतडय़ांच्या आत असणारा पदार्थ बाहेर टाकून देत राहतात. गमतीशीरच प्रकार वाटतोय ना? पण हे बहुतांशी खरे आहे. अनेक जणांना आयुष्यभर ही आतडय़ांची चिडचिड त्रास देत असते. दिवसांतून ३-४ वेळा शौचाला जाऊनसुद्धा पोट साफ वाटत नाही ही तक्रार रुग्णांकडून अनेकदा ऐकू येते.

पोटामधील आतडय़ांना अमिबा (amobea) किंवा जिआर्डिया (giarda) या जंतूंचा जंतुसंसर्ग झालेला असेल तर शौचातून आव व क्वचित रक्त पडून वरील तक्रार ऐकू येते. त्याला आम्ही अ‍ॅमोबीयासिस/गियार्डिआसिस  (amobeiasis/ giardiasis) म्हणतो. हे जंतू उघडय़ावरील अन्नपदार्थ खाण्याने सहजपणे आपल्या पोटात शिरत असतात. मेट्रोजील किंवा टिनीडाझोल यासारखे अँटि अ‍ॅमोबिक (anti amoebic) औषध देऊन ते बरे होतात.

Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Personality Traits According to Zodiac Signs in Marathi
Personality Traits : प्रेमात पडण्यापूर्वी ‘या’ राशींचे लोक खूप वेळ घेतात; सहज प्रेमात पडत नाही
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स

परंतु बरेचदा काहीही जंतुसंसर्ग नसताना देखील अनेक जणांना एकसारखी शौचातून आव पडत असते. अशा लोकांना कितीही वेळा आवेची अँटिबायोटिक औषधं दिली तरीही तक्रार/त्रास चालूच असतो.

काही लोकांना जास्त त्रास का?

सर्वप्रथम आपण आव म्हणजे काय ते समजावून घेऊ. आव म्हणजे मोठय़ा आतडय़ांमधून नैसर्गिकपणे स्रवणारा चिकट शेंबडासारखा पदार्थ होय. ज्याप्रमाणे नाकातील आतील त्वचा ओलसर रहावी म्हणून नाकात शेंबूड तयार होत असते, त्याप्रमाणे मोठय़ा आतडय़ाच्या आतील आवरण ओलसर रहावे म्हणून चिकट किंवा शेंब तयार होत असते.

आतडय़ाला जंतूंचा किंवा अमिबाचा संसर्ग झाला की ही आव तयार होण्याचं प्रमाण वाढतं. (खरं पाहता हा एकप्रकारे आतडय़ाला कमी इजा व्हावी व त्याचं संरक्षण व्हावं यासाठीची व्यवस्था असते. ) लोकांना पोटात दुखून शौचाला होते. त्यात आव पडू लागते. ज्यास योग्य अमिबानाशक (antiamoebic) वा जंतुनाशक (antibiotic) औषध देऊन बरी होते.

आतडय़ात आव जास्त प्रमाणात तयार होण्यास महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक चिंता, ताणतणाव, रात्रीची अपुरी झोप, बदलत्या कामाच्या वेळा (बदलत्या पाळ्या) यामुळे रात्री झोप न मिळणे. यामुळे आतडय़ांच्या हालचालींवर परिणाम होतो. आतडय़ांची हालचाल वाढते. आव निर्मितीचं प्रमाण वाढलं जातं. आतडय़ांमध्ये आव जास्त प्रमाणात तयार झाल्याने या व्यक्तीला ३-४ वेळा शौचाला जायला लागतं. शौचातून नुसती आव पडत राहते. (सर्दी झाल्यावर नाक जसं शिवशिवतं व शेंबूड बाहेर येत राहतो, त्याप्रमाणे) यालाच आपण आतडय़ांची चिडचिड वा तडतडणारी आतडी (Irritable Bowel Syndrome) म्हणतो.

मन व शरीर यांचा संबंध

बिघडलेली मानसिक स्थिती अशा आतडय़ांच्या दुखण्यास जन्म देत असते. अशा प्रकारे आयबीएस (Irritable Bowel Syndrome) त्रास असलेली व्यक्ती आपली आव थांबली म्हणून आवेची अँटि अ‍ॅमोबिक (Antiamoebic) औषध उदा. मेट्रोजिल व एन्ट्राव्हायोफार्म सारख्या गोळ्या घेत राहतात. परंतु तरीही आव पडण्याचा, शौचाला अनेक वेळा जाण्याचा त्रास चालूच राहतो. अशा व्यक्तींनी पोटाच्या तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासून घ्यावे.

सारखी आव पडते म्हणून वरच्यावर अ‍ॅँटिअमिबिक वा अ‍ॅँकिटबारटिकसारखी औषधे घेत राहिल्यामुळे आतडय़ांमध्यचे आवश्यक व नैसर्गिक जीवाणू मारले जातात. हे नैसर्गिक जीवाणू आपल्या आतडय़ांना उपद्रवी विषारी जीवाणूंपासून सुरक्षित ठेवायचे काम करत असतात. डॉक्टरी सल्लय़ाशिवाय सतत घेत रहिलेल्या औषधामुळे हा तोल ढासळतो. आतडय़ातले नैसर्गिक व संरक्षक जीवाणू कमी होतात. अशी आतडी मग जंतुसंसर्गाला जंतू-जीवाणू, विषाणू, अमिबा बळी पडतात व पुन्हा आव पडू लागतो.

आयबीएसचे निदान कसे होते?

सतत आवेचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरकडूनच आपली तपासणी करून घ्यावी. मलाचा तपास बेरियम एनिमा, कॉलेनोस्कॉपी – हे दोन्ही तपास आतडय़ांच्या आतील कार्य व त्याची परिस्थती दाखवतात व काही आजार असल्यास योग्य निदान करता येते. जागतिक संघटनेच्या परिमाणानुसार (रोम गाइडलाइन्स)  पुन्हा पुन्हा पोटात दुखणे किंवा पोटामध्ये अस्वस्थता वाटणे. (किमान तीन महिने )

  • किमान तीन महिने यातील दोन किंवा जास्त बाबी
  • शौचाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा (Improvement with defecation)
  • शौचाला होण्याच्या वारंवारेतील बदल (Onset associated with a change in frequency of stool)
  • मलामधील बदल – कडक किंवा पातळ होणे (Onset associated with a change in form (appearance) of stool)

साधारणपणे आयबीएस असलेल्या व्यक्तींचे वरील तीनही तपास १- मलाचा तपास, २- बेरियम एनिमा, ३- कोलॅनोस्कॉपी नॉर्मलला येताच तरच आयबीएसचे निदान केले जाते.

आयबीएस किंवा आतडय़ांची तडतड – हा प्रकार कुठल्याही जंतूंच्या संसर्गाने होत नाही. तर मानसिक ताण – तणावामुळे याचा उद्भव होतो.

आयबीएसची औषध योजना

  • आहार नियमित ठेवावा. ज्या पदार्थानी त्रास होत असेल ते टाळावेत. (उदा. जड किंवा वातूळ पदार्थ)
  • झोप पूर्ण होऊ  द्यावी.
  • ज्या व्यक्तींना शक्य असल्यास बदलीच्या पाळीची नोकरी करू नये.
  • आपली दिनचर्या बदलावी. वातावरणाशी जुळवून घ्या.
  • मन शांत राहण्यासाठी-शवासन, प्राणायाम, ध्यानधारणा करावं.
  • कपालभाती, अग्निसार, वगैरेसारखे योगप्रकार तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली करावे.
  • मानसिक ताण कमी करण्यासाठी सौम्य अशी अँक्झॉलिटिक औषधे डॉक्टरांच्या सल्लय़ाने घ्यावीत.
  • पोट साफ ठेवण्यासाठी इसबगोलची पावडर रात्री झोपताना पाण्यासोबत घ्यावी.

डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com