विदर्भासह महाराष्ट्रातील १६ शिक्षणशास्त्र अध्यापन पदविका महाविद्यालये अर्थात, डीएड आणि चार अध्यापक महाविद्यालये अर्थात, बीएड महाविद्यालये कायमची बंद करण्यास राष्ट्रीय शिक्षण शिक्षक परिषदेने अर्थात, ‘एनसीटीई’ने मान्यता दिल्यामुळे जवळपास १३० प्राध्यापकांचे संसार रस्त्यावर येणार असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.
राज्यात विनाअनुदानित खाजगी डी.एड. आणि बी.एड. महाविद्यालयांचे पेव फुटल्यामुळे आणि राज्य शासनाने शिक्षकांची भरती बंद केलेली आहे. त्यामुळे डीएड, बीएड महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशाची इतकी मारामार सुरू झाली की, पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी ही महाविद्यालये ओस पडली आहेत आणि विना अनुदान तत्वावर ती चालवणे केवळ अशक्य असल्याने महाविद्यालये कायमची बंद करण्यास संस्थाचालकांनी एनसीटीईकडे परवानगी मागितली होती. महाराष्ट्रातील १६ डीएड आणि ४ बीएड महाविद्यालये बंद करण्यास संस्थाचालकांना परवानगी देण्यात आली.
एनसीटीईच्या पश्चिम विभागीय समितीच्या अध्यक्ष  माला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य अनिल बेडगे, जे.एस. ग्रेवाल, विभागीय संचालक सुनील श्रीवास्तव, महाराष्ट्राचे सदस्य एल.एल.िशदे, गोव्याचे लुईस व्‍‌र्हर्नल, छत्तीसगढचे आर.के. वर्मा, मध्यप्रदेशचे प्रभाकर श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत एनसीटीई भोपाळच्या पश्चिम विभागीय समितीच्या तीन  एप्रिल २०१४ ला झालेल्या बठकीत महाराष्ट्रातील १६ डीएड आणि चार बीएड महाविद्यालये बंद करण्यास संस्थाचालकांना परवानगी देण्यात आली.
दरम्यान, राज्यातील १६ डीएड आणि चार बीएड महाविद्यालये बंद होणार असल्याच्या भीतीने आता या संस्थांमध्ये पाच-पाच
वषार्ंपासून कायम असलेल्या प्राध्यापकांसमोर जगण्याचाच प्रश्न उभा ठाकला आहे.

बंद होणारी १६ डीएड महाविद्यालये
बी.एड.बरोबरच १६ डी.एड. महाविद्यालयेही बंद करण्यास एन.सी.टी.ई.ने मान्यता दिली आहे. त्यात विदर्भातील यवतमाळच्या कृष्णा कडू यांच्या सुदाम शिक्षण संस्थेची २, तेल्हारा येथील नर्मदा बोडखे, जी.एच. रायसोनी, नागपूर, अंकुश शिक्षण संस्था, नागपूर, देवरत्न कॉलेज, नागपूर, अशी ६, तर बार्शी, नवी मुंबई, जी.एच. रायसोनी, वाघोली (पुणे), पुणे शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे, सरूड (कोल्हापूर), इस्लामपूर (सांगली), आर.बी.टी कॉलेज, नागाव (धुळे), रामदुलारी तिवारी, नागाव (धुळे), समता मंडळ, परांडा (उस्मानाबाद) आणि जनसेवा शिक्षण मंडळाचे शिवाळे मुरबाद (ठाणे) येथील डी.एड. महाविद्यालयांचा समावेश आहे.
बंद होणारी चार बीएड महाविद्यालये
विदर्भातील खासदार विजय दर्डा यांच्या हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ, यवतमाळ, जी.एच. रायसोनी, नागपूर आणि फाल्गुनराव पाटील, आरमोरी (गडचिरोली), अशा तीन संस्थाचालकांची बी.एड. महाविद्यालये, तसेच आर.बी.टी कॉलेज, नागाव (धुळे) येथील बी.एड. महाविद्यालय बंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.