मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या व्यावसायिक खासगी अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांसाठीची (ईबीसी) उत्पन्नाची मर्यादा एक लाख रुपयांवरून साडेचार लाखांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे.
व्यावसायिक खासगी अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कापैकी ५० टक्के शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकार करते. एक लाख रुपयांहून कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आतापर्यंत ईबीसीच्या योजनेत होत होता. उत्पन्नाची ही मर्यादा फारच कमी असून गरीब विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत. परिणामी उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची मागणी सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी दिली.ाहाविद्यालयांमधील वाढते शुल्क आणि पालकांचे उत्पन्न लक्षात घेता उत्पन्नमर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे,' असे टोपे यांनी सांगितले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















