राज्यातील सर्व प्रकारच्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी आणि सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी, आधार कार्ड काढण्याची सक्ती करण्यात आली आहे.
‘उच्च व तंत्रशिक्षण विभागा’ने या संदर्भात परिपत्रक काढून आपल्या विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांना हे आदेश दिले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचा तपशील संगणकावर तात्काळ उपलब्ध व्हावा यादृष्टीने, तसेच विविध योजनांतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना अचूकपणे लाभ देण्यासाठी आधार क्रमांकाची व त्यांच्या बँक खात्याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात विभागाने सर्व सरकारी, अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना सूचना केली आहे.