मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात ‘आधुनिक ज्ञानसंपदा केंद्र’ उभारण्यात येणार असून त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त असेलेले विद्यापीठातील हे पहिलेच ‘आधुनिक ज्ञानसंपदा  केंद्र’ असणार आहे.
हे केंद्र संपूर्ण संगणकीकृत आणि डिजिटाईझ्ड असणार आहे. यातील ग्रंथालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. ई-ग्रंथालय, दृकश्राव्य खोली, वाचनालय, बहुमाध्यम अभ्यास केंद्र, डिजिटल आणि िपट्र रिसोस्रेस, सभा केंद्र, खुली जागा, वाय-फाय अशा अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या ग्रंथालयामध्ये आठ लाखांहून अधिक पुस्तके, जर्नल्स, संदर्भ पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे केंद्र ‘हरित इमारत’ या संकल्पनेवर आधारित आहे. विद्यापीठाच्या दोन्ही ग्रंथालयांत असलेली प्राचीन आणि दुर्मिळ दर्जेदार पुस्तके डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याव्यतिरिक्त या केंद्रात हे विद्यार्थी, शास्त्रज्ञ, संशोधकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
तसेच ई-सेवेसाठी ग्रंथालयात संगणकाची सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.