राज्यातील ११०० आश्रमशाळांमधील पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, वहय़ा, पुस्तके, युनिफॉर्म, भाज्या, अंथरूण-पांघरूण आणि अन्य शैक्षणिक साहित्य यासाठी खर्चापोटी संबंधित संस्थांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी एक रुपयाही अनुदान पोहोचलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.प्रत्यक्षात आश्रमशाळांना खर्चासाठी ३० टक्के रक्कम आगाऊ दिली जाते. मात्र अद्याप अनुदान वितरित केले नसल्याची तक्रार मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी केली.