राज्याच्या व्यवसाय मार्गदर्शन केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सेवेमध्ये काळानुरूप बदल करण्याबरोबरच ही सुविधा राज्यातील मोजक्याच केंद्रांऐवजी प्रत्येक जिल्ह्य़ातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत आता विनासायास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांचा करिअरचा मार्ग प्रशस्त होण्यास मदत होणार आहे. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था या संस्थेच्या परीक्षक समितीची दर तीन वर्षांकरिता नियुक्ती करण्यात येते. अभ्यासक्रमात बदल सुचविणे, लघुसंशोधनासाठी विषय सुचविणे, पदविका अभ्यासक्रम राबविण्यासाठी सल्ला देणे व मार्गदर्शन करणे इतपतच आतापर्यंत या समितीचे काम मर्यादित होते. परंतु जागतिक दर्जाचे रोजगाराभिमुख दर्जेदार शिक्षण मिळावे, या दृष्टीने या समितीमध्ये बदल करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. आटपाडी, माळशिरस आणि वाई येथील १२ हजार विद्यार्थ्यांची अ‍ॅप्टिटय़ूड चाचणी गेल्या वर्षी राबविला. प्रत्येक शाळेत किमान एक समुपदेशक उपलब्ध व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक जरग यांनी सांगितले.
राज्यस्तरीय समिती रचना
शालेय शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, शिक्षण संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, बालमानसोपचारतज्ज्ञ, उद्योगक्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ व व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्थेचे उपसंचालक यांचा समावेश असेल. स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्याची मानसिकता कशी निर्माण करता येईल, या दृष्टीने उपाययोजना व दिशादर्शन करण्याची जबाबदारी या समितीवर  जिल्हास्तरीय समिती
प्रत्यक्ष शाळांमध्ये मुलांना समुपदेशन व करिअरविषयक मार्गदर्शन कसे मिळेल याच्या उपाययोजना करण्याची जबाबदारी. राज्यातील २० हजार माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना समुपदेशन व करिअर मार्गदर्शनाबरोबरच स्वजागरुकता, कौशल्य व चारित्र्य विकास, स्पर्धा परीक्षांची, शिष्यवृत्त्या व बक्षिसांची माहिती, नैराश्य कमी करणे, लिंग समभावाची भावना दृढ करणे, पौंगडावस्थेतील मुलांकरिता विशेष कार्यक्रम घेणे, व्यक्तिमत्त्व व नेतृत्त्व गुण विकसित करणे या दृष्टीने मार्गदर्शन करण्याची जबाबदारी. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या या समितीत जिल्हा शिक्षणाधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, बालमानसोपचारतज्ज्ञ, शिक्षक, उद्योग क्षेत्रासी संबंधित व्यक्ती आदींचा समावेश