विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संबंधित चर्चेचे उत्तर देत असताना मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेतील ची सूत्रे न देता सभात्याग केला. याचा निषेध म्हणून विद्यार्थी तसेच शिक्षक प्रतिनिधी यांनी कुलगुरूंच्या राएका सदस्याने शंका उपस्थित करण्यासाठी हात उंचावला, याचा राग येऊन कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी कुणाकडेही सभेजीनाम्याची मागणी करत एकच गोंधळ घातला.
विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तसेच विद्यापीठाची पुढील वाटचाल कशी असेल याबाबत बृहत् आराखडा मंजूर करण्यासाठी शुक्रवारी विद्यापीठात अधिसभा आयोजित करण्यात आली होती. यात मागील सभेतील आश्वासनांवर काय कृती करण्यात आली याबाबत सदस्यांनी विविध मुद्दे मांडले. विद्यार्थी व शिक्षक प्रतिनिधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर कुलगुरू उत्तर देत असताना एका सदस्याने शंका उपस्थित करण्यासाठी हात उंचावला. याचा राग आल्याने कुलगुरू काहीही न बोलता सभेतून निघून गेले.
या गोंधळानंतर प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी पाच मिनिटांसाठी सभा तहकूब केल्याचे जाहीर केले. पाच मिनिटांनी सभा सुरू झाल्यावर कुलगुरू स्थानापन्न झाले. मात्र विद्यार्थी व शिक्षक प्रतिनिधींनी कुलगुरूंनी झाल्या प्रकाराबाबत माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र तसे न झाल्याने सुमारे २५ जणांनी सभात्याग केला. काही वेळाने त्यांनी सभागृहात प्रवेश करत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र तुम्ही सभात्याग केला असल्यामुळे तुम्ही कोणतेही मुद्दे मांडू शकणार नाही, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले. यानंतर सर्वानी बाहेर येऊन कुलगुरूंच्या विरोधात घोषणा देत घडल्या प्रकाराचा निषेध केला.

मागील अधिसभेतील आश्वासनांवर कोणती कार्यवाही न झाल्याने त्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याने कुलगुरूंनी सभेतून पळ काढला.
– प्रदीप सावंत, अधिसभा सदस्य (युवासेना)
या कुलगुरूंच्या कार्यकाळात अनेक कामे खोळंबली असून विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाली आहेत.
– प्रा. वसंत शेकाडे, अधिसभा सदस्य (बुक्टू)
वर्षांतून दोन अधिसभा होतात त्यात विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याचा आम्हाला अधिकार असतो. मात्र या समस्या मांडण्यासाठी अनेकदा संधीच दिली जात नाही. याचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केला.
   – सुधाकर तांबोळी, अधिसभा सदस्य (मनविसे)

पालघरसाठी विशेष मान्यता
नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यत नवीन महाविद्यालयासाठी अर्ज सादर झाले तर त्या अर्जाना बृहत आराखडय़ानुसार विशेष मान्यता देण्यात यावी असे अधिसभेत सुचविण्यात आले. अधिसभेने त्याला मान्यता दिल्यामुळे भविष्यात नव्या जिल्ह्यला नवीन महाविद्यालये मिळण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.
बृहत् आराखडा मंजूर
अधिसभेतील गोंधळानंतर  विद्यापीठ आणि महाविद्यालये विकास मंडळाचे संचालक डॉ. राजपाल हांडे यांनी सन २०१५-१६ बृहत आराखडा सभेसमोर मांडला. यावर उपस्थितांकडून काही सूचना आल्यानंतर तो आराखडा मंजूर करण्यात आला. या आराखडय़ात विद्यापीठाच्या कार्यकक्षेत कौशल्याधारित समाज महाविद्यालये, रात्र महाविद्यालये, विधी महाविद्यालये उभारण्यास प्राधान्य देण्यात यावे, वास्तुशास्त्र महाविद्यालया आणि बी.एफ.ए. महाविद्यालये, बी.एड. महाविद्यालये, अस्तित्त्वात असलेल्या महाविद्यालयांना अतिरिक्त तुकडय़ा मंजूर करून देणे अशा मुद्यांचा समावेश आहे.