शिक्षक पात्रता परीक्षा कशासाठी घेतली जाते याचा विचार केला, तर परीक्षेबाबतची भीती कमी होण्यास मदत होईल. परीक्षा कशासाठी आहे, हे लक्षात आल्यानंतर प्रश्नपत्रिकांचे स्वरूप लक्षात येते. पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या सरधोपट परीक्षांपेक्षा ही परीक्षा नक्कीच वेगळी आहे. परीक्षा कशासाठी आहे, हे स्पष्ट होण्याबरोबरच या विचाराचा उपयोग प्रत्यक्ष प्रश्न सोडवतानाही होणार आहेच.
परीक्षेचे महत्त्व
शिक्षक हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. शिक्षक म्हणून त्याचा संपर्क शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, त्यांचे पालक व इतर समाजाशी येत असतो. त्यामुळे विविध kg02घटकांबाबत त्याचा दृष्टिकोन कसा आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते. शिक्षणशास्त्रातील पदविका किंवा पदवी प्राप्त करताना विद्यार्थ्यांनी विषयाचा सखोल अभ्यास केलेला असतो. विषयांशी संबंधित विविध घटकांचे त्याला ज्ञान असते, मात्र शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे म्हणून पदवी प्राप्त केली म्हणजे त्या विषयातील संपूर्ण ज्ञान आपल्याला प्राप्त झाले असे होत नाही. बदलणाऱ्या काळानुसार शिक्षकाने आपले ज्ञान अद्ययावत केले पाहिजे. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात तर शिक्षण क्षेत्रात अनेक बदल वेगाने होत आहेत. या बदलाबाबत आपल्याला माहिती असायला हवी. याच पाश्र्वभूमीवर शिक्षकांची अभिक्षमता तपासण्यासाठी ही परीक्षा घेतली जात आहे.
शिक्षक अभिक्षमता नेमकी काय? – उमेदवाराच्या मनाचा कल हा शिक्षण क्षेत्राकडे झुकलेला आहे का, त्याच्यामध्ये एक आदर्श शिक्षक होण्याची योग्यता आहे का, चांगल्या शिक्षकास आवश्यक ते गुण त्याच्याकडे आहेत काय इ. गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची, त्यांना समजून घेण्याची क्षमता शिक्षकामध्ये आहे का? आपल्या विद्यार्थ्यांबाबत, त्यांच्या पालकांबाबत आणि समाजाबाबतचा शिक्षकांच्या दृष्टिकोनाची चाचपणी शिक्षकांच्या अभिक्षमता चाचणीमधून करण्यात येते.
अनुमान क्षमता
निरीक्षण केलेल्या घटनेचे कारण किंवा निष्कर्ष काढण्याची क्षमता म्हणजे अनुमान क्षमता. यामध्ये व्यक्तीच्या पूर्वज्ञानाचा आणि पूर्वानुभवांचा वापर केला जातो. अनुमानामध्ये घटनेचे कारण शोधण्यासाठी मानसिक प्रक्रिया घडून येतात. यामध्ये विविध चिन्हांचे अन्वयार्थ लावण्याची क्षमता, संबोधनिर्मिती क्षमता, भाषिक क्षमता यांचाही उपयोग होतो. अनुमान हा विचारप्रक्रियेचा उच्चतम स्तर आहे. निरनिराळ्या संबोधांची जुळवाजुळव करून, तुलना करून नवीन नियम किंवा सूत्र तयार केले जाते.
गणितीय क्षमता – आकडेमोड करण्याची क्षमता, विविध प्रकारच्या उदाहरणांचे आकलन झाल्यानंतर योग्य सूत्रांच्या मदतीने ती उदाहरणे सोडविण्याची क्षमता व अंकगणितीय क्षमतांचा समावेश गणितीय क्षमतांमध्ये होतो. या क्षमता योग्य प्रकारे विकास, हे चांगल्या बुद्धिमत्तेचे लक्षण आहे.
या वरील सर्व क्षमता भावी शिक्षकांमध्ये आहे किंवा नाहीत ते पाहण्याचे काम महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षाद्वारे केले जाते.
प्रा. सचिन परशुराम आहेर, सेवासदन अध्यापिका विद्यालय, पुणे ३०

शिक्षक होण्यासाठी कोणत्या क्षमता आवश्यक आहेत?
अध्यापन क्षमता – अध्यापन
करणे हेच शिक्षकाचे उद्दिष्ट आहे. चांगले अध्यापन करण्यासाठी शिक्षकाने काही कौशल्ये
आत्मसात केली पाहिजेत.
*आशयसंबंधित ज्ञान – जो विषय शिकवायचा त्याबाबतचे सखोल आणि अद्ययावत ज्ञान हवे.
*नियोजन – कोणत्या भागाचे अध्ययन कधी करावे, किती वेळ द्यावा, याबाबतचे नियोजन हवे.
*वातावरणनिर्मिती – अध्ययनासाठी पोषक ठरेल अशा वातावरणाची निर्मिती करणे, विद्यार्थ्यांला विषयात रस वाटेल असे वातावरण तयार करण्याचे कौशल्य हवे.
*सादरीकरण – आशय सादरीकरणासाठी योग्य अध्यापन व तंत्रे, अध्यापनाची साधने निवड करण्याचे कौशल्य गरजेचे आहे.
*आंतरक्रियांचे आकलन – वर्गात घडणाऱ्या विविध प्रकारच्या आंतरक्रिया समजून घेण्याची आणि जोपासण्याची क्षमता हवी.
*मूल्यमापन क्षमता – विद्यार्थ्यांच्या क्षमता काय आहेत, त्या वयानुसार योग्य आहेत का, याचे मूल्यमापन करता आले पाहिजे.
वाचन आकलन क्षमता :
वाचन हेच शिक्षकाचे भांडवल आहे. शिक्षकाला फक्त वाचन करून भागत नाही, तर त्याचे पूर्णपणे आकलन होणे गरजेचे असते, कारण त्याला वाचलेले विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे असते, विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे असते. प्रभावी आणि परिणामकारक अध्यापनासाठी शिक्षकाने वाचले पाहिजे आणि या वाचनाचे आकलन त्याला झाले पाहिजे.

IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
Funny Answer Sheets Viral
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांने सांगितला नवा उपाय; व्हायरल उत्तरपत्रिका वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा
how to choose career after 12th
बारावीची परीक्षा तर संपली, ‘मग आता पुढे काय?’ करिअर निवडण्याआधी ‘या’ गोष्टी पाहा…