मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- फेरतपासणीची लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी डीन समितीच्या सूचना
- व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तवापासून दूर -पी. साईनाथ
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उमा चंद्रशेखर वैद्य यांची निवड करण्यात आली आहे.
कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरूपद २ नोव्हेंबरपासून रिक्त होते. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी गुरुवारी डॉ. वैद्य यांच्या नावाची घोषणा केली. डॉ. वैद्य सध्या मुंबई विद्यापीठात संस्कृत विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गुरूदेव टागोर तुलनात्मक साहित्य अध्यासनाचे प्रमुखपदही त्यांनी भूषविले आहे. कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. वैद्य या पदावर पुढील पाच वर्षे राहतील.
डॉ. वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून १९७२ साली प्रथम येण्याचा मान मिळवित विशेष प्राविण्यासह पदवी शिक्षण पूर्ण केले. १९७४ साली त्यांनी प्रथम श्रेणीत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
मुंबई विद्यापीठातून १९७९ साली त्यांनी संस्कृत या विषयातून पीएचडी मिळविली. विल्सन महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून काम केल्यानंतर त्या विद्यापीठात रूजू झाल्या. डॉ. वैद्य यांना अध्यापन, प्रशासन आणि संशोधन क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या नावावर आतापर्यंत ७३ संशोधन प्रबंध जमा आहेत.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्या. एफ. आय. रिबेलो यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने राज्यपालांकडे डॉ. वैद्य यांच्यासह तिघांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर राज्यपालांनी या तिन्ही उमेदवारांची मुलाखत घेऊन कुलगुरू म्हणून डॉ. वैद्य यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
संपूर्णपणे संस्कृत विषयासाठी वाहिलेले हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. त्यामुळे, माझा आजवरचा अध्ययनातील, अध्यापनातील, संशोधनातील अनुभव वापरून संस्कृतसाठी भरीव काम करण्याची संधी या नियुक्तीमुळे मला मिळाली आहे. त्याचा उपयोग आनंदाने, नेकीनं आणि प्रामाणिकपणे करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे डॉ. उमा वैद्य यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.




















मुळात संस्कृत हि एकमेव भाषा आहे जी भारतात कुठेच बोलल्या/वापरल्या जात नाही. म्हणून तिची उपयोगिता आणि दैनंदिन जीवनातली गरज हाच एक संशोधनाचा विषय आहे. इतिहासातल्या पुराव्यांवरून हे सिद्ध झाले आहे कि ती युरोपातून आलेल्या ब्राह्मणांची भाषा आहे आणि तिचा मूळच्या भारतीय भाषांसोबत जाणीवपूर्वक संबंध जोडला आहे (आणि सारेच ब्राह्मण युरोपातून आलेले नाहीत, त्यातले केवळ गोरी चामडी, काळे केस आणि निळे डोळे असलेलेच फक्त!). केवळ ब्राह्मणांचे पोट भरण्यासाठी आणि अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी ह्या भाषेचा उदोउदो सुरु आहे. तरीही आपले तथाकथित बुद्धीजीवी (तेही ब्राह्मणच आहेत) सांगतात कि ती आपली मूळ भाषा आहे? आता आपण कुलगुरू निवडीकडे वळूया…..
कुलगुरू निवड समितीमध्ये ३-४ लोक असतात. त्यात राज्यपालांचा सचिवही (IAS officer) असतो, आर्थिक तडजोड करायला (हे मी मागील काही बातम्यांच्या comments मध्ये लिहिले आहे). दुर्दैवाने त्यात शिक्षण क्षेत्रातले लोक नगण्यच असतात. अशावेळी कुलगुरुपदासाठी देशातला एखादा माजी न्यायमुर्ती कसं काय एखाद्याचे नाव सुचवू शकतो? त्याचा (आणि तोही अलाहाबाद, इतक्या दूरचा?) वा त्या समितीत असलेल्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काय संबंध? राज्यातल्या साऱ्याच विद्यापीठात low profile आणि भ्रष्ट मानसिकतेचे लोक कुलगुरू झाले आहेत अलीकडे, ते ह्यामुळेच. ह्या वैद्य बाई जातीने ब्राह्मण आहेत. म्हणूनच त्यांची रामटेकच्या संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. आता त्या राज्याच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन काय दिवे लावतात ते पाहात बसा? ज्या विद्यापीठांमधून कुशल लोक तयार होऊन देशहितासाठी मदत करू शकतात तिथे कित्येक वर्षापासून जागा भरल्या नाहीत (जाणीवपूर्वक रिकाम्या ठेवल्या आहेत).
आणि ह्या संस्कृत विद्यापीठात साऱ्याच्या साऱ्या जागा भरलेल्या आहेत, त्याही ब्राह्मण जातीच्या लोकांना संधी देऊन (विद्यापीठाच्या website वर जाऊन बघावे). हे बिनकामाचे विद्यापीठ जनतेच्या पैशातून आपण कशासाठी चालवतो ह्याचा विचार करण्याची आपली कुवत नाही काय? जिथे ब्राह्मणांचा स्वार्थ/हित साधल्या जाते तिथे चुपचाप/बिनबोभाट सारी प्रक्रिया पार पडली जाते. आणि जिथे ते नसतील तिथे काहीतरी कुरापती काढून कायम चर्चा आणि बदनामी सुरु ठेवली जाते. रामटेकचे संस्कृत विद्यापीठ बंद करून तिथे निर्माण होणारी RSS च्या आतंकवाद्यांची factory खल्लास करावी. निदान पैशांचा अपव्यय तरी थांबेल.