‘ई-लर्निंग’च्या धर्तीवर राज्य शासन ‘ई-बालभारती’ हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी येथे दिली. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे पहिली ते पाचवी हे वर्ग प्राथमिक शाळेसाठी जोडले जाणार आहेत, शिक्षकांचे समायोजन केल्याशिवाय शिक्षक भरती केली जाणार नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, की राज्य शासन यापुढे ई-लìनगवर भर देणार आहे. केवळ विद्यार्थ्यांना टॅब देऊन त्यावर बालभारतीची पुस्तकांचा मजकूर न पुरवता विद्यार्थ्यांशी संवादी स्वरूपाचे शिक्षण मिळावे असा प्रयत्न आहे. शिवाय ई-बालभारती हा नवा उपक्रम सुरू केला जाणार आहे. सध्या ई-लìनगचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असले, तरी त्यातील अधिकृत कोणते हे स्पष्ट नाही. शिवाय ते खर्चीक असल्याने पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे डॉ. काकोडकर, माशेलकर अशा मान्यवरांचा सल्ला घेऊन उपक्रम सुरू केला जाणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.
तावडे म्हणाले, शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शाळेसाठी पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग जोडणे बंधनकारक आहे. आघाडी शासनाने त्याची प्रशासकीय पातळीवर येणाऱ्या अडचणींचे कारण सांगून अंमलबजावणी केलेली नव्हती. नव्या शासनाने याबाबतची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे, असे तावडे म्हणाले.
ज्या शाळांमध्ये याकरिताचे मूलभूत गोष्टींची पूर्तता आहे तेथे अंमलबजावणीला या शैक्षणिक वर्षांपासूनच सुरुवात करण्यात येणार आहे. जिथे या गोष्टींची पूर्तता नाही. तेथे या बाबी राज्य शासनाच्या वतीने पुरविल्या जातील. दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाकडे ४४ शिफारशी प्राप्त झाल्या असून शिक्षणतज्ज्ञ पालक व जाणकारांच्या मतांचे अवलोकन करून याबाबतचा निर्णय शासन लवकरच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
Jayant Patil son
जयंत पाटील यांना मुलाच्या राजकीय भवितव्याची काळजी
farmer protest
शेतकर्‍यांबरोबर चर्चेच्या चौथ्या फेरीत काय ठरले? शेतकऱ्यांसाठी केंद्राची पंचवार्षिक योजना काय आहे?