काही वर्षांपूर्वी बिहारच्या शाळा म्हणजे गुंडापुंडांचे अड्डे आणि गुराढोरांचे गोठे अशा होत्या. लालूप्रसादांच्या जंगलराजमध्ये शिक्षण आणि शिक्षकांची दैनावस्था झाली होती. विद्यार्थ्यांमध्ये हडेलहप्पी वृत्ती वाढीस लागली होती. आता मात्र बिहारचे हे चित्र बदलत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारने शिक्षणात शिस्त आणली. विद्यार्थ्यांना मोफत सायकली व गणवेशापासून शिष्यवृत्ती देण्यापासून सुरू झालेली शैक्षणिक क्रांती यंदा अधिकच जोमात असेल. यंदापासून बिहारमधील प्रत्येक शाळा-शिक्षक व विद्यार्थ्यांचे चक्क मूल्यमापन केले जाणार असून त्यानुसार त्या शाळेला अनुदान मिळणार आहे.
बिहारमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी सत्ताधारी जदयू व भाजप युती सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पातळीवरचे मूल्यमापन आखून दिले आहे.
तसेच शाळेसाठीही काही दंडक आखून दिले आहेत. या सर्वाची पूर्तता केल्यास शाळेला सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानात घसघशीत २० टक्के वाढ होणार आहे.
काय आहे योजना?
शाळेत पुरवल्या जाणाऱ्या सुविधा, तेथील शिक्षकांचा दर्जा, शाळेचे व्यवस्थापन, शाळेचा सामाजिक कार्यातील सहभाग, शिक्षकांची कामाप्रती कटिबद्धता, त्यांचे वेळेत येणे-जाणे, त्यांच्या वाचनाच्या सवयी वगैरे मुद्दय़ांवर शाळा व शिक्षकांचे मूल्यमापन केले जाणार आहे. १५० गुणांच्या आधारावर शाळेचे मूल्यमापन केले जाईल व त्यानुसार अ, ब, क किंवा ड अशी श्रेणी दिली जाईल. तर शिक्षकांचे मूल्यमापन १२० गुणांच्या आधारावर केले जाईल. शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असून शिक्षकांना खास प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
अंकगणित
* राज्यातील एकंदर विद्यार्थी संख्या अडीच कोटी
*  शिक्षकांची संख्या साडेपाच लाख
* सरकारी शाळांची संख्या ७४ हजार
*  हिंदी, इंग्रजी, गणित आणि पर्यावरणशास्त्र या विषयानुरूप विद्यार्थ्यांचे मूल्यमापन
*  शिक्षक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणार. त्यांना गुण नव्हे तर श्रेणी देतील
* पहिलीच्या विद्यार्थ्यांना तीन-चार शब्दांचे इंग्रजी वाक्य वाचून दाखवणे, हिंदी वांचा विकास करणे व त्याचा शिकवताना उपयोग करणे सक्तीचे असेलाचता-लिहिता येणे व गणिताचे १०० पर्यंतचे आकडे लिहिता येणे आदी बंधनकारक असेल
*  पाचवीच्या विद्यार्थ्यांना व्याकरणाचा योग्य वापर, कवितेचा चार-पाच ओळीत गर्भार्थ सांगता येणे, इंग्रजी व हिंदीतील कोणत्याही धडय़ावर किमान दहा ओळी लिहिता येणे, दहा हजारांपर्यंतची आकडेमोड; म्हणजे बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार करता आला पाहिजे. २० पर्यंतचे पाढे तोंडपाठ असायला हवेत.