ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे समायोजन तातडीने करून त्यांना थकीत वेतन अदा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. तातडीने कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित शिक्षण अधिकारी यांचे वेतन थांबविण्यात येईल, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहे.
२१ मार्च रोजी पुण्यात शिक्षण आयुक्तांनी या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असून सिंधी, मराठी, गुजराती, कन्नड व तेलगु माध्यमातील शिक्षकांचे समायोजन यामध्ये होणार आहे. तसेच अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनही तातडीने काढण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
faculty and non-teaching staff have not been paid since two months in Department of Higher Education in West Vidarbha
प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही; तब्बल साडेपाच हजारांवर…
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र