शालेय शिक्षकांसाठी सरकारने उजळणी अभ्यासक्रम (रिफ्रेशर कोर्स) तयार केला असून त्यात जगभरातील ताज्या घडामोडींबरोबरच ज्ञानाच्या इतर स्रोतांचीही माहिती शिक्षकांना करून दिली जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेतर्फे (एनसीटीई) हा अभ्यासक्रम आखला जाणार असल्याचे शालेय शिक्षण सचिवा सचिव वंृदा सरूप यांनी येथे स्पष्ट केले.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सोमवारी येथे आयोजित कार्यक्रमा सरूप यांनी शिक्षकांच्या उजळणी अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. त्या म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपेक्षेप्रमाणे शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न यात आहे. एनसीटीई ही संस्था या उजळणी अभ्यासक्रमावर काम करीत आहे. शिक्षकांना भरपूर ज्ञान देण्याचा प्रयत्न यात केला जाणार असून बदलत्या जगाचे प्रतिबिंब त्यात असेल’.  त्या पुढे म्हणाल्या, ‘बी. एड व एम. एड हे दोन अभ्यासक्रम दोन वर्षांचे केले जाणार आहेत.
शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेत हा निर्णय गेल्या आठवडय़ात घेण्यात आला होता. बारावीपासून हुशार मुलांना शिक्षकी पेशाकडे वळवण्यासाठी बी.एड हा एकात्मिक अभ्यासक्रम बी ए पदवीबरोबर एकात्मिक करण्यात आला आहे. ज्यांना डीएड म्हणजे पदविका अभ्यासक्रम करायचा असेल त्यांना तो बारावीनंतर दोन वर्षांत करता येईल. एम एड हे मुक्त व दूरशिक्षण पद्धतीने करता येणार नाही’.
मोदींचे स्वप्न
बनारस हिंदू विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात पाच वर्षांचा प्रशिक्षण कार्यक्रम हा शिक्षकी पेशासाठी असावा असे मत व्यक्त केले होते व चांगल्या शिक्षकांची वानवा असल्याची खंत व्यक्त केली होती. श्रीमंत व्यक्तींना जरी विचारलेत तुम्हाला काय पाहिजे तर त्यांचेही उत्तर चांगले शिक्षक हवेत हेच आहे असे मोदी म्हणाले होते.