अनेक चुका, गोंधळ यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सातवी आणि चौथीच्या शिष्यवृत्तीचा निकाल अखेर सोमवारी जाहीर केला. मात्र, शिष्यवृत्ती मिळाल्याची गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.
चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. २३ मार्चला राज्यभरात ही परीक्षा झाली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. शासनाच्या यापूर्वीच्या निर्णयानुसार १ मे रोजी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, या तरतुदीचा कायमचाच विसर परीक्षा परिषदेला पडला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या या निकालाबाबत उत्सुकतेची असलेली शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी परिषदेने जाहीर केलेली नाही. परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. मात्र, आपल्याला शिष्यवृत्ती मिळणार की नाही हे कळण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले गुण पाहून त्याबाबत काही आक्षेप असल्यास परिषदेला कळवायचे आहेत. सर्व आक्षेपांची पडताळणी झाल्यानंतर अंतिम निकाल आणि शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीच्या यादीत बदल झाल्यामुळे यादीतून आयत्या वेळी वगळण्यात आलेले विद्यार्थी निराश होतात. त्यावर तोडगा म्हणून या वर्षीपासून हा उपाय परिषदेने शोधून काढला आहे.
‘निकाल व शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाल्यावर त्यावर काही आक्षेप येतात. विद्यार्थ्यांच्या यादीत आणि गुणांमध्ये त्या आक्षेपांनुसार फरक पडतो. त्यामुळे यादीतील शेवटच्या विद्यार्थ्यांना आधी शिष्यवृत्ती मिळाल्याचे जाहीर करून नंतर यादी बदलल्यावर वगळावे लागते. मुलांना अशाप्रकारे निराश व्हावे लागू नये म्हणून आधी त्यांना त्यांचे गुण दाखवून सर्व आक्षेपांची पडताळणी करून त्यानंतरच महिनाभरामध्ये अंतिम यादी जाहीर करण्यात येईल,’ असे परिषदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थी आपला परीक्षा क्रमांक वापरून http://www.mscepune.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील

rain in Sangli and the northern parts of Tasgaon
सांगली, तासगावात पावसाने दिलासा
health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Viral Video Shows childhood favourite crispy twisted sweet Cream Rolls making in a factory
क्रिम रोल खायला आवडतात का? पाहा कारखान्यात कसे तयार होतात; VIDEO पाहून आठवतील लहानपणीचे दिवस
colors marathi Sindhutai Maazi Maai serial off air today telecast last episode
अवघ्या आठ महिन्यांत ‘ही’ लोकप्रिय मालिका झाली ऑफ एअर, आज प्रसारित झाला शेवटचा भाग