प्रसिद्ध गणितज्ज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गणित वर्षांचे औचित्य साधून फोर्टच्या विज्ञान संस्थेतर्फे २४ आणि २५ जानेवारीला गणित परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही परिषद संस्थेचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध गणितज्ञ दिवंगत प्रा. राम अभ्यंकर यांना अíपत करण्यात येत आहे. या परिषदेसाठी Topics in Commutative Algebra हा विषय निवडण्यात आला आहे. परिषदेमध्ये भारतीय संख्याशास्त्र संस्थेचे दिलीप पाटील, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे श्रीकांत भाटवडेकर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉनॉजीचे (आयआयटी) प्रा. सुधीर घोरपडे आदी प्रख्यात गणिततज्ञाची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या परिषदेमुळे विदयार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होईल. तसेच संशोधकांसाठी गणितातील संशोधनाची नवीन दालने उघडतील.
परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क – सेल्बी जोस – ९८२०३९६७७४ किंवा   http:/selbyjose.com/activities/1/