गणेशोत्सवाच्या सुटीचा प्रश्न प्रत्येक शाळेने शिक्षक-पालक सभा घेऊन आपापल्या स्तरावर सोडवावा, असा सहजसुलभ तोडगा शालेय शिक्षण विभागाने सणांच्या सुट्टय़ांवरून सुचविला आहे. पण, गणेशोत्सवाला पाच दिवस सुटी असावी, अशी मागणी करणाऱ्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे त्याने समाधान झालेले नाही. म्हणून आता त्यासाठी जनजागृतीची स्टंटबाजी मनविसे करणार आहे.गणेशोत्सवाला मराठीबरोबरच इतर भाषक शाळांनीही सुटी द्यावी, असे निवेदन शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात येणार आहे. शाळांच्या दीर्घ सुटीतील काही दिवस कमी करून पाच दिवसांची सुटी द्यावी, अशी मागणी या त्यात करण्यात आली आहे.