जागा वाढल्याने ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) २०१४ च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेमध्ये आणखी ६१२ उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. यापैकी सर्वाधिक १८८ उमेदवार पुण्यातील आहेत.
राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल ११ एप्रिलला जाहीर करण्यात आला. त्यात ५,७८३ उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र करण्यात आले होते. त्यावेळी खुल्या, ओबीसी, डीटी, एनटी (सर्वसाधारण) या प्रवर्गाची कटऑफ ४०० पैकी १४० गुण इतकी होती. ही कटऑफ आता १३८ गुणांवर आणण्यात आली आहे. उपलब्ध जागांमध्ये भर पडल्याने कटऑफ खाली आणून आणखी उमेदवारांना पात्र ठरविण्यात आल्याचे एमपीएससीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी सांगितले.
उपलब्ध जागांच्या १२ पट उमेदवार पुढच्या टप्प्याकरिता पात्र ठरविले जातात. जागा वाढल्याने आणखी उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरविण्यात आले आहे.