मित्रांनो,
आज आपण मागील आठवडय़ातील प्रश्नमालिकेत देण्यात आलेले प्रश्न कशा प्रकारे सोडवावेत, याविषयी चर्चा करणार आहोत़ विद्यार्थ्यांनी ठोकळेबद्ध पद्धतीने उत्तरे पाठ न करता एकाच प्रश्नातून अनेक प्रश्न कसे तयार करता येतात व त्यातून परीक्षेच्या अभ्यासाची उजळणी कशी करता येते, ते पाहणार आहोत़
उदा़ प्रश्न क्रमांक १ मध्ये विचारल्याप्रमाणे राष्ट्रीय आणीबाणी विषयक प्रश्न विचारला आह़े या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक चार (ड)हे आह़े विद्यार्थ्यांनी एवढय़ावरच समाधान न मानता प्रश्नात विचारल्याप्रमाणे चारही विधानांतून स्वत: प्रश्न तयार करणे आवश्यक आह़े असे प्रश्न कसे तयार करता येतात ते पाहू या़ उदा़ आजपर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली आह़े या विधानातून विद्यार्थी परीक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न पुढीलप्रमाणे स्वत: तयार करू शकतात़
१ राष्ट्रीय आणीबाणीविषयक राज्यघटनेतील कलम कोणते?
२ हे कलम राज्यघटनेच्या कितव्या भागात आहे?
३ आणीबाणीचे प्रकार किती? त्यांची कलमे कोणती?
४ आणीबाणीविषयक संसदेचे/ पंतप्रधानांचे/ मंत्रिमंडळाचे अधिकार कोणते?
५ आणीबाणी कोण जाहीर करतो?
६ आणीबाणी लागू केली त्यावेळी कोणते सरकार होते?
७ महाराष्ट्रात त्यावेळी मुख्यमंत्री/ राज्यपाल कोण होते?
८ आणीबाणीविषयक घटनात्मक प्रकिया काय आहे?
९ ४२वी घटना दुरुस्ती व आणीबाणी यांचा संबंध कशा प्रकारे होता?
१० आणीबाणीमध्ये मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये यांवर काय परिणाम होतो ?
११ न्यायालयाची भूमिका काय होती?
अशा प्रकारे एकाच विधानातून अनेक प्रश्न निर्माण होतात़ यांमधून विद्यार्थ्यांची उजळणी तर होतेच याशिवाय असे प्रश्न परीक्षेला विचारले गेल्यास संभ्रमित न होता अचूक उत्तर शोधण्यास वैचारिक प्रगल्भता येत़े तसेच अशा प्रकारच्या प्रश्नांविषयी वेगळा दृष्टिकोन तयार होतो़ त्यातूनच विद्यार्थी आत्मविश्वासपूर्वक परीक्षेला सामोरा जाऊ शकतो़ ऐनवेळी आणीबाणीविषयक पारंपरिक प्रश्नांपेक्षा वेगळा प्रश्न विचारल्यास त्यांचा गोंधळ उडणार नाही़ कारण आणीबाणीविषयक संभाव्य प्रश्नांची तुमची तयारी अगोदरच पूर्ण झालेली असेल़
अशा प्रकारे एका प्रश्नातील दिलेल्या पर्यायांवरून अनेक प्रश्न तयार करणे व त्याच्या नोट्स तयार करणे यांवर भर देणे आवश्यक आह़े या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांच्या आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या स्वरूपावरून वरील चर्चेचे महत्त्व नक्कीच समजले असेल. विद्यार्थ्यांनी वरील मुद्दे पद्धतीने लक्षात ठेवून नव्या अभ्यासक्रमाचा व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास त्यांना यशाची खात्री निश्चितच बाळगता येईल़
विषय- भारतीय राज्यपद्धती व राजकीय व्यवस्था
प्र १ (४) अ ब क ड, प्र २ (२) अ ब क ड, प्र ३ (क ) प्र ४ (क ), प्र ५ (२)
विषय- इतिहास
प्र ६ (अ), प्र ७ (अ), प्र ८ (क), प्र ९ (अ), प्र १० (अ)
विषय- भारताचा आर्थिक व सामाजिक विकास
प्र ११ (क), प्र १२ (ड), प्र १३ (ड),  प्र १४ (ब) (क), प्र १५ (४) अ, ब, क, ड, प्र १६ (ड)