मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
'महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा'तर्फे ऑक्टोबर, २०१२मध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल १४.६१ टक्के तर बारावीचा १९.०३ टक्के इतका लागला आहे. राज्याच्या नऊ विभागीय मंडळापैकी मुंबईचा दहावी-बारावी परीक्षेचा निकाल सर्वात कमी आहे.
दहावीचा सर्वाधिक कमी निकाल लातूर विभागाचा (९.२६ टक्के) असून त्या खालोखाल मुंबईचा (१० टक्के) आहे; तर सर्वात जास्त निकाल नाशिकचा (२४.९९) आहे. बारावीच्या निकालात २६.२८ टक्के इतका निकाल नोंदवित औरंगाबादने आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल नाशिकचा २२.८१ इतका निकाल आहे. बारावीचा मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे १५.३४ टक्के इतका आहे.
मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातून १ लाख ७२ हजार ५४३ इतक्या विद्यार्थ्यांनी बारावीची तर २ लाख २० हजार ८०३ इतक्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी बारावीचे ३२ हजार ८३१ तर दहावीचे ३२ हजार २६९ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















