विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता फारच कमी वेळ मिळत असल्याने मुंबई विद्यापीठाने आपल्या दुसऱ्या सत्राच्या तब्बल २३ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यात टीवायबीकॉम परीक्षेचाही समावेश आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षा निवडणुकीमुळे लांबल्याने विद्यापीठाचे दुसऱ्या सत्राचे वेळापत्रकच कोलमडून गेले होते.    विद्यापीठाने २३ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एमए, टीवायबीए, टीवाबीकॉम, बीपीएड या अभ्यासक्रमाच्या काही विषयांच्या परीक्षा ६ ते २३ एप्रिल दरम्यान सुरू होत होत्या. त्या दोन ते तीन आठवडय़ांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. टीवायबीकॉमची ८ एप्रिलपासून सुरू होणारी परीक्षा आता २१ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.एमएससी, एलएलएमच्याही परीक्षा एक ते तीन आठवडय़ांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी दिली.