मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण रुजविण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीचे निमित्त साधून सोमवार, १४ जानेवारी रोजी युवा दिन साजरा करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील क्रीडा संकुलात दिवसभर होणाऱ्या या कार्यक्रमात मान्यवरांची व्याख्याने आणि पोस्टर प्रदर्शन यांचा समावेश असेल.
या कार्यक्रमासाठी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ग्रामीण भागांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी शहरातील ५० निवडक महाविद्यालयांकडे सोपविण्यात आली आहे. सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होईल.
त्यानंतर शिक्षण, रोजगार आणि मूल्ये या विषयावरील पहिल्या सत्रात विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिनेश सिंग विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर 'समाज सबलीकरण आणि माध्यमे' या विषयावरील सत्रात पत्रकार राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, राजू हिरानी आणि मुकेश शर्मा सहभागी होतील. शेवटच्या सत्रात 'सेवेसाठी राजकारण' या विषयावर खासदार संजय राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड, देवेंद्र फडणवीस, नितीन सरदेसाई सहभागी होतील.
कार्यक्रमाचा समारोप गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत होईल. वाहतूकविषयक प्रश्नांवर ते विद्यार्थ्यांशी बोलतील, अशी माहिती कुलगुरु राजन वेळुकर यांनी दिली आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















