चार महिन्यांचे शुल्क न भरल्यामुळे सेंट जोसेफ विद्यालयात सहावी इयत्तेत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीला परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. पालकांनी आपल्या मुलीला अपमानित केल्याबद्दल जाब मुख्याध्यापिकांना विचारल्यावर, अशी घटना आपल्या शाळेत घडल्याचे मुख्याध्यापकांच्या लक्षात आले.
गुरुवारी सहावीची सराव परीक्षा वर्गामध्ये सुरू असताना वर्गशिक्षकाने या मुलीला परीक्षेला बसण्यास मनाई केली. याबाबत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीस सईदा यांना पालकांनी जाब विचारल्यावर  शुल्कावरून तिच्यावर कारवाई केल्याचे सईदा यांनी सुरुवातीला वर्गशिक्षकाची पाठराखण केली. सेंट जोसेफ विद्यालय व्यवस्थापनाने जम्मू-काश्मीर येथील पूरग्रस्तांसाठी पालकांकडून धान्य, कपडे, गृहोपयोगी साहित्य जमविण्यात आले आहे. ही मदत जमा करून शाळा व्यवस्थापन आपले सामाजिक बांधीलकीचे प्रतीक दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अडीच हजार रुपयांच्या मासिक शुल्कापोटी विद्यार्थिनीला अपमानित केले आहे.  
मुख्याध्यापिका सईदा यांनी मुलीची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत आहे. खासगी इंग्रजी शाळांना हा नियम लागू होत नाही. विद्यार्थिनीला परीक्षेपासून वंचित ठेवणे, हे शिक्षण कायद्याचे उल्लंघन आहे, असे मत पनवेल तालुका गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.