टीईटीच्या तयारीची पायाभरणी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या पाठय़पुस्तके, वर्तमानपत्रे, नियतकालिके, संदर्भ पुस्तके यांच्या वाचनातून होते. आपण जे काही वाचत आहोत त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचे नेमके उत्तर कोणते याचा सतत विचार करणे अत्यावश्यक ठरते. जेणेकरून आपल्या kg01तयारीत परीक्षाभिमुखतेची हमी येईल. जे भाग कच्चे आहेत असे वाटत असेल, त्यांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा. अभ्यासातील सातत्य व नियमितता या बाबींना पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. तयारी झाली असे वाटत असले तरीही परीक्षेपर्यंत प्रत्येक विषयाची उजळणी आवश्यक आहे. सगळ्या विषयांच्या उजळणीकडे लक्ष द्या. विषयानुसार तयारी कशी करता येईल, ते दोन भागांमध्ये आपण पाहणार आहोत.

भाषा-१ (मराठी)
मराठी ही मातृभाषा असली तरी तिला गृहीत धरू नये. मराठी विषयाचा ‘टीईटी’चा हेतू प्रश्नपत्रिकेचा उद्देश उमेदवाराचे भाषिक ज्ञान, अभिव्याप्ती, आकलनक्षमता, लेखन व संवादकौशल्याच्या जाणिवा पडताळणे असा आहे. तयारीच्या शेवटच्या टप्प्यांत भाषिक बारकावे आणि व्याकरणाची उजळणी करणे आवश्यक आहे.

मराठी व्याकरणाची तयारी
१ मराठी व्याकरणातील
शब्दांच्या जाती, काळ ओळखा या घटकांची तयारी करताना तक्त्यांचा उपयोग होऊ शकेल. शब्दांच्या आठ जाती, काळ, त्याचे प्रकार, उपप्रकार यांचे तक्ते करून त्यात संपूर्ण माहिती भरावी. परीक्षेपूर्वीच्या उजळणीसाठी या तक्त्यांचा उपयोग होईल.
२ वाक्प्रचार आणि म्हणी हे मराठी व्याकरणातील महत्त्वाचे घटक. वाक्याचे विविध प्रकार, त्यांची वैशिष्टय़े, एखाद्या वाक्याचे दुसऱ्या प्रकारात रूपांतर करताना होणारे बदल इत्यादी या घटकांची उजळणी करताना रोजच्या वापरातील वाक्यांचे रूपांतर करावे. वाक्प्रकाराचा व म्हणींचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करण्यासाठी सातवीच्या स्कॉलरशिपची पुस्तकेही उपयोगी ठरतील. सरावासाठी परीक्षेपूर्वी रोजच्या वापरात वाक्प्रचार आणि म्हणींचा उपयोग करा.

इंग्रजी (भाषा-२)
उताऱ्याची मुद्देसूद रचना- याला आपण इंग्रजीमध्ये ढं१ंस्र्ँ१ं२्रल्लॠ म्हणून ओळखतो. यामध्ये आधी कधीही न वाचलेला उतारा वाचून समजून घेणे व त्याचे आकलन करणे, स्वत:च्या शब्दात, सुटसुटीतपणे आणि सोप्या भाषेत उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे याचा यात समावेश आहे.
१ व्याकरण – यामध्ये शालेय स्तरावरील इंग्रजी भाषा व्याकरण तपासले जाते. जसे की वाक्यातील चुका सुधारणे, वाक्य रूपांतरित करणे, वाक्यातील चुका ओळखून वाक्य सुधारणे, योग्य काळाचा वापर, योग्य विरामचिन्हांचा वापर, शब्दांचे योग्य रूप तयार करून वापरणे, वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करणे, शुद्धलेखनाचे नियम वापरता येणे इ. मिळून व्याकरणाचा घटक बनतो. सरावासाठी एक वाक्य घेऊन त्याच्यावर विविध संस्कार करून पाहायचे. रोज ठरवून अशा प्रकारचा सराव केल्यासही इंग्रजीबद्दल आत्मविश्वास वाढेल. रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्रे यांमधून खूप सारे दर्जेदार इंग्रजी ऐकावयास व वाचावयास मिळते. या सर्व माध्यमांचा योग्य उपयोग करून घेता येईल.
२ गणित – प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गणित विषयाचा, अगदी बालवाडीपासून संबंध येतो. शालेय स्तरावरील गणित हा विषय अभ्यासणे ते व्यावहारिक उपयोगासाठी गणिताचा वापर करणे या सर्व गोष्टींवर आधारित प्रश्न टीईटीत विचारले जातात. प्रश्नांची संख्या व उत्तरे देण्यासाठी असलेला कमी वेळ याचा ताळमेळ बसवण्यासाठी सराव आवश्यक ठरतो. काही तयार क्लृप्त्यांचा (रेडिमेड) वापर करून उदाहरणे कमी वेळेत सोडविता येतात, असा गैरसमज अनेकांचा असतो. सर्वात प्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की क्लृप्ती तयार होण्यामागे कोणत्या मूलभूत संकल्पना वापरलेल्या आहेत, त्याचा शोध घ्या. क्लृप्त्या स्वत: तयार करा. तयार क्लृप्त्यांच्या उजळणीपेक्षा मूलभूत संकल्पनांची उजळणी करा.
या परीक्षेतील गणित या विषयाचा अभ्यासक्रम हा शालेय पाठय़पुस्तकातील गणित विषयाच्या अभ्यासक्रमावरच आधारित असतो. त्यासाठी प्रत्येकाने दहावीपर्यंत असलेल्या गणित विषयातील सर्व संकल्पना समजावून घेणे आवश्यक ठरते. गणित या विषयाचा अभ्यासक्रम विचारात घेतल्यास यामध्ये मूलभूत, अंकगणित, बीजगणित, व्यावसायिक गणित व भूमिती इत्यादी उपघटकांचा समावेश होतो. केवळ थोडय़ा काळाचा विचार न करता चिरकाल टिकणारा अभ्यासक्रम करण्यासाठी आपण आवश्यक वेळ दिल्यास गणितातील सर्व प्रश्नांची उत्तरे देता येणे शक्य आहे. केवळ एक-दोन दिवसांच्या अभ्यासातून गणित या विषयाचे संपूर्ण आकलन होत नसते, तर त्यासाठी किमान सहा-सात महिने सातत्यपूर्ण तयारी करणे आवश्यक आहे.