राज्यात सरकार आणि खासगी संस्था यांच्या संयुक्त भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची योजना असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
राज्यातील काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील परिस्थिती फारच गंभीर आहे. पुरेशा पायाभूत सुविधा नसताना पटसंख्या वाढविण्यात आली होती. वैद्यकीय परिषदेने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा कमी का करू नये, अशी नोटीस पाठविली आहे, असे तावडे यांनी सांगितले. अमरावतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची मागणी बच्चू कडू (अपक्ष) यांनी केली असता, संयुक्त भागीदारीमध्ये पर्यायावर विचार सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले.