मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
पुणे विद्यापीठ हे वैमानिक प्रशिक्षण सुरू करणारे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरणार असून जर्मनी येथील एफएफएल इन्स्टिटय़ूटच्या सहकार्याने पुणे विद्यापीठ हा अभ्यासक्रम सुरू करणार आहे.
'एफएफएल इन्स्टिटय़ूट' ही वैमानिक प्रशिक्षण देणारी जर्मनीतील सर्वात जुनी संस्था आहे. ही संस्था पुणे विद्यापीठाशी करारबद्ध होत असून पुणे विद्यापीठामध्ये वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न सध्या पुणे विद्यापीठात केला जात आहे. सध्या भारतामध्ये सुरू असणाऱ्या डिरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर हा अभ्यासक्रम असणार आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागामध्ये हा अभ्यासक्रम चालवण्यात येणार आहे. एकूण अठरा महिने कालावधीचा हा अभ्यासक्रम असून त्यासाठी साधारण ४५ लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अभ्यासक्रमातील थिअरीचा भाग पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागामध्ये आणि प्रात्यक्षिक जर्मनीमध्ये एफएफएल इन्स्टिटय़ूटमध्ये शिकवले जाणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमासाठी एकावेळी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठीचे निकष अजून निश्चित झाले नसून त्यासंबंधी सध्या चर्चा सुरू आहे, असे पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी सांगितले.
असा झाला शिक्षक शाळाबा..
* डिसेंबरमध्ये बालस्नेही (आनंददायी) शिक्षणासाठी दोन दिवसांची कार्यशाळा
* याच महिन्यात मुख्याध्यापकांसाठी पाच दिवसांचे सक्षमीकरण शिबीर
* २८ जानेवारीला सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनाअंतर्गत 'प्रकल्प' कसे करावेत यासाठी कार्यशाळा
* जानेवारीमध्ये प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी आठवडाभर शिक्षक सिंधुदुर्गच्या सफरीवर
* फेब्रुवारीत पाचवी ते आठवी वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण कसे द्यावे याचे प्रशिक्षण
* ब्रिटिश कौन्सिलतर्फे १९ ते २५ फेब्रुवारी रोजी इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण
* फेब्रुवारीत ५ दिवस सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनाअंतर्गत प्रशिक्षण
* दुष्काळी गावांतील शिक्षक गावातील पाणीपुरवठय़ाची तपासणी करण्यासाठी २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान शाळेबाहेर
* व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत 'सलाम मुंबई'कडून रत्नागिरीत २७ आणि २८ फेब्रुवारीला दोन दिवसांचे प्रशिक्षण
* याशिवाय मीना मंच, शैक्षणिक साहित्य निर्मिती, मराठी-हिंदी विषयांच्या शिक्षकांकरिता समुपदेशनाचे प्रशिक्षण, किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या समस्यांवर यशदातर्फे प्रशिक्षण, राज्य विज्ञान केंद्रातर्फे गणित शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम




















माझ्या मते हि एक बोगस योजना विद्यापीठातल्या पाश्चिमात्य विचारसरणीच्या भ्रष्ट लोकांनी आणली आहे, आणि ती पूर्णपणे अयशस्वी होणार हे नक्की! याचे कारण हे कि, त्या अभ्यासक्रमासाठी लागणारा भरमसाठ पैसा (४५ लाख रु.), आणि त्याची जाणीपूर्वक केलेली विभागणी. अभ्यासक्रमातील थिअरीचा भाग हा फार महत्वाचा असेल असे दिसत नाही, पण प्रात्यक्षिक मात्र अतिशय महत्वाचे असते. यात विद्यापीठाला अत्यल्प लाभ होऊन खरा हिस्सा जर्मनी नेणार. वरून आपले भारतीय विद्यार्थी तिथे प्रात्यक्षिकासाठी गेल्यावर जर्मनीतले महाभाग ते प्रामाणिकपणे शिकावतीलच कशावरून? कारण तिथे खरा अडथळा हा भाषेचा असणार, वरून वंशवाद वेगळाच! इतका पैसा खर्च केल्यावर केवळ शिकवल्याच नाटक जर्मनी करणार नाही कशावरून, आणि मग आपण काय साधणार? हे युरोपियन तर आतून भारतीयांविषयी प्रखर वर्ण-धर्मद्वेष ठेवतात पण दाखवत नाहीत. ह्या साऱ्या प्रकरणात मध्यमवर्गीय भारतीयांना कंगाल करून आपली ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जर्मनीला मदत होणार.
तिकडे सबंध युरोपात भूकमारी आली आहे. तिथे साऱ्या युरोपात लोकांपुढे दररोज जगावे कसे हा प्रश्न असतो, आणि आता डाव्या विचारसरणीच्या लोकांना हाताशी धरून, रस्त्यावर उतरून जनता रक्तरंजीत उठाव/आंदोलन करू पाहात आहे. तो होऊ नये यासाठी तेथील सरकारांनी पुरेपूर दडपशाही सुरु ठेवली आहे. अर्थव्यवस्था तग धरून राहावी यासाठी EU ला आता आशियातल्या पूर्वाश्रमीच्या गरीब देशांसोबत सोयरिक करावी लागत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे वरील अभ्यासक्रम! तिकडे ह्यांना भिक लागली म्हणून भारतात भाकरीचा तुकडा शोधण्यासाठी हि खुळी धडपड आहे. तशा strategies ते बनवताहेत. अलीकडच्या फ्रांस-इंग्लंड च्या राष्ट्रप्रमुखांच्या भारतवाऱ्या आणि गुडघे टेकवणं हाहि त्याचाच भाग आहे. असल्या नाटकांची ते पूर्णपणे तालीम करून येत असतात. आणि त्यांना माहित आहे, कि भारतीयांना काहीही दिले तरी खातात म्हणून! अलीकडेच एक IVI नावाची Spanish कंपनीने भारतातल्या काही भिकारचोट डॉक्टरांना धरून एक Nova-IVI हि joint venture सुरु केले आहे.
आहेत ते अभ्यासक्रम नीट चालले आहेत का याचीच शंका असतांना ,असल विकतच दुखन कशाला ?
http://www.novaivifertility.com/ हि कंपनी मनुष्य प्रजनन तंत्रज्ञानामध्ये काम करते. त्यांचे मूळ उद्दिष्ट हे भारतातून शक्य तितका आणि वाट्टेल त्या मार्गाने पैसा मिळवणे आहे. त्यातही एक फंडा त्यांनी शोधून काढला आहे. तो म्हणजे त्यांच्या spanish clinics मध्ये जे संततीहीन दाम्पत्य येते त्यांचे मुल भारतीय बाईच्या उदरात (सरोगेट मदरचा गोरखधंदा!) वर नमूद डॉक्टरांच्या मदतीने ठेवायचे. “कारण तसे फक्त भारतातच (कायद्याने) करता येते”. म्हणजे गोरी बाई नामानिराळी राहून पैसा देऊन मुल नेणार, पण वेदना मात्र भारतीय गरीब बाई सहन करणार. त्यातून त्यांनी एक अभ्यासक्रम आणला आहे तोहि वरील अभ्यासक्रमाप्रमाणेच आहे. थियरी तुमची, प्रात्यक्षिक आमचं! म्हणजे पैसा खर्च करूनही ज्ञानदान करतीलच हे सांगता येणार नाही पण पैसा मात्र कमावणार. भारतीय डॉक्टर पैशासाठी गरज नसताना गर्भाशय काढून तेही विकताहेत (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18638347.cms). गरिबांचे मूत्रपिंड काढून ते विकण्याचे
माफिया या देशात आहेत. डॉक्टरांनाच देव मानणाऱ्या गरीब तरुण महिलांवर ऑपरेशन्स करून गर्भाशय काढून टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. सिझरीनचेहि तेच होते आहे. देशात जगायचं तरी कसं? आणि सावध रहायचं तर नक्की कशाकशापासून? निद्रिस्त समाज, प्रभावहीन न्यायपालिका, भ्रष्ट नोकरशाही आणि अनुभवशुन्य पत्रकारिता ह्या देशाला कुठे नेत आहात ह्याचा विचार करा…..जागे व्हा आणि पेटून उठा!