‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे ऑक्टोबर-सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या (२५ नोव्हेंबर) जाहीर करण्यात येणार आहे.
मंडळाच्या  संकेतस्थळावर हा निकाल दुपारी १ पासून उपलब्ध होईल. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील. तसेच माहितीची प्रतही घेता येईल. गुणपत्रिकांचे वाटप ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता संबंधित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना करण्यात येईल.
विद्यार्थ्यांना दुपारी ३ नंतर गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर ४ ते १५ डिसेंबरदरम्यान अर्ज करायचा आहे. तर छायाप्रतीसाठी २५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान अर्ज करायचा आहे. ज्यांना पुनर्मूल्यांकन करायचे आहे त्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक असणार आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे.

माहितीसाठी संपर्क
 ०२०-६५२९२३१६/७(पुणे), ०७१२-२५६०२०९(नागपूर), ०२४०-२३३४२२८(औरंगाबाद), ०२२-२७८९३७५६/८१०७५(मुंबई), ०२५३-२५९२१४३(नाशिक), ०२३१-२६९६१०३(कोल्हापूर), ०७२१-२६६२६०८(अमरावती), ०२३८२-२२८५७०(लातूर), ०२३५२-२३१२५०/२८४८०(कोकण)