‘मुंबई युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टिचर्स युनियन’ (बुक्टू) या मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी रोहिणी सिवाबालन तर सरचिटणीसपदी मधू परांजपे यांची निवड करण्यात आली.
संघटनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘बुक्टू’ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या सभेला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील सुमारे १५०० शिक्षक हजर होते.
उपाध्यक्षपदी जी. बी. राजे, बी. आर. साळवे, वसंत शेकाडे, खजिनदारपदी डॉ. जोस जॉर्ज सहसचिवपदी बी. एम. शिकारे, मोहम्मद ताहीर आणि शैलेंद्र सिंग यांची निवड झाली आहे. संघटनेच्या कार्यकारी समितीमध्ये तप्ती मुखोपाध्याय, सी. आर. सदाशिवन, के. के. ठेकेदत्त, सी. एस. कुलकर्णी, प्रकाश दातार, अंजली कानिटकर, अनुपमा सावंत, उत्तम यादव. एस. वाघमारे, प्रदीप शिंपी, शशीरेखा एस., हरीश दुबे, आर. बी. सिंग, एस. पी. वेल्हाळ, हेमा रामचंद्रन आणि एस. एम. वाघ यांची निवड जाहीर  करण्यात आली आहे. २०१४ ते २०१६ या दरम्यान ही कार्यकारिणी कार्यरत राहील.