मुंबई महानगर क्षेत्रासाठी सुरू असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून ही प्रक्रिया ९ जुलैऐवजी १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत करता येणार आहे.
दुसऱ्या यादीत ५३,६०२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. यापकी ३४,६११ विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी बेटरमेंटची संधी मिळाली तर या यादीत १८,९९१ नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. यातील १९,७७२ विद्यार्थ्यांनी ११ जुलैपर्यंत शुल्क भरून प्रवेश निश्चिती केली आहे. आतापर्यंत १,०३,६९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली आहे. तिसरी गुणवत्ता यादी १५ जुलै रोजी जाहीर होणार असून त्या यादीतील विद्यार्थ्यांनी १७ जुलैपर्यंत प्रवेश निश्चिती करणे अपेक्षित आहे.