ब्रिटिश कौन्सिलतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘आयईएलटीएस’ पुरस्काराकरिता मुंबईच्या श्वेता दाभोलकर हिच्यासह देशभरातील १० विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे.

या पुरस्कारांतर्गत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाकरिता तीन लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यास मदत करणे हे पुरस्कारमागचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ४० भारतीय विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून परदेशी शिक्षणाची संधी मिळाली आहे. श्वेता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थेमध्ये उच्च शिक्षण घेण्याकरिता जाणार आहे. श्वेताला युनेस्कोच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे.